Press Conference of Professor Jogendra Kawade of Peoples Republican Party of India 
अहिल्यानगर

बापरे! दवाखाने हव्यासापोटी निगेटिव्ह रुग्णांना पॉझिटिव्ह दाखवून काढतायेत लाखांची बिले

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये आर्थिक पिळवणूक केली जाते. तेथे गैरव्यहवार होत असून या खाजगी रूग्णालयाला फी ठरवून द्यावी. कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या अवयवाची तस्करी होत असल्याचे गंभीर प्रकार कानी पडत असल्याने कोविड सेंटरमध्ये चाललेल्या कारभारावर सरकार व आरोग्य विभागाने कटाक्षाने नजर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.

कोरोना महामारी ही गरिबांना उध्वस्त करणारी आहे. त्यामुळे राज्य, देश व जगावर आर्थिक संकट निर्माण झाल्याचा दावाही कवाडे यांनी केला. अकोले येथे एका विवाहासाठी ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाचे जयदीप कवाडे, गणेश सोनवणे, शशिकांत सोनवणे, प्रा. जयंत गायकवाड, सुनील गायकवाड उपस्थित होते.
काही माध्यमांकडून कोरोनाबाबत भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. त्याच्या धास्तीने भीतीचे वातावरण होत आहे. त्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. सरकारने याबाबत स्वतंत्र बुलेटिन काढून कोरोनाची सद्यस्थिती नागरिकांना दिली पाहिजे.

राज्य सरकार रुग्णांमागे दीड लाख रुपये मदत देते. पण दवाखाने हव्यासापोटी पॉझिटिव्ह नसलेल्या रुग्णांना पॉझिटिव्ह दाखवून लाखांची बिले काढून रुग्णांना अधिक आर्थिक दृष्ट्या पिळवणूक करीत आहेत, असे स्पष्ट करून लॉकडाउनच्या अंधार यात्रेत जनतेला ढकलण्याऐवजी त्यांना हॉस्पिटल बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी कोरोना साथ फैलाव होण्यापूर्वीच्या वातावरणाचा व नंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्राध्यापक कवाडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला व त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याऐवजी या साथीसाठी केंद्राकडून भरीव आर्थिक अनुदान प्राप्त करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT