The process of re reservation of Sarpanch posts for Gram Panchayats has reached the final stage 
अहिल्यानगर

रिक्त सरपंचपदासाठी फेरआरक्षण ! जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींसाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : संबंधित संवर्गातील सदस्यांअभावी जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या जागा रिक्‍त राहिल्या. या ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाच्या फेरआरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या महिनाअखेर सरपंचनिवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
कोरोनामुळे जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15 जानेवारीला निवडणुका होऊन 18 जानेवारीला निकाल जाहीर झाले. त्यानंतर सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानुसार अनेक ठिकाणी सरपंचांची निवड झाली. मात्र, जिल्ह्यातील 35 ठिकाणी सरपंचपद संबंधित संवर्गातील सदस्यांअभावी रिक्‍त राहिले होते. आता त्यावर तोडगा काढण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचं पुन्हा भयानक रुप, एकाच कुटुंबातील 10 जणांना लागण
 
एखाद्या संवर्गातील महिला सदस्य नसल्यास त्याच संवर्गातील पुरुषाला सरपंचपद देता येणार आहे. मात्र, महिला वा पुरुषही सदस्य नसल्यास, अशा ठिकाणी फेरआरक्षण काढले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार सरपंचपदाच्या फेरआरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिल्यानंतर आरक्षणाची सोडत जाहीर केली जाईल. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या सदस्यांना तीन दिवस अगोदर सूचित केले जाणार आहे. सदस्यांसमक्ष आरक्षणाची सोडत काढली जाणार असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली. 

सरपंचपद रिक्त राहिलेल्या ग्रामपंचायती 

कोपरगाव- तिळवणी, मढी खुर्द, येसगाव, श्रीरामपूर- गोवर्धनपूर, मातुलठाण, मांडवे, कुरणपूर. नेवासे- जळके खुर्द. राहुरी- चिंचाळे, उंबरे, वळण, मल्हारवाडी, धानोरे. शेवगाव- नवीन दहिफळ, नागलवाडी. श्रीगोंदे- घोडेगाव, वडाळी, आर्वी. जामखेड- गुरेवाडी. कर्जत- तिखी, टाकळी खंडेश्‍वरी, पिंपळवाडी, चिलवडी. नगर- रुईछत्तिशी, पिंप्री घुमट, धनगरवाडी. अकोले- कुंभेफळ, वाशेरे, घोडसरवाडी, जांभळे, परखतपूर, औरंगपूर, तांभोळ, इंदोरी आणि पिंपळगाव खांड. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT