Progress of the organization if priority is given to positivity 
अहिल्यानगर

सकारात्मकतेला प्राधान्य दिल्यास संस्थेची प्रगती : घुले

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : सहकारी संस्था चालविणे दिवसेंदिवस अधिक जिकिरीचे होत चालले आहे. नकारात्मक बाबी दूर सारून सकारात्मक गोष्टींना प्राधान्य दिले, तर संस्थेचा वटवृक्ष उभा राहतो. माध्यमिक पतसंस्थेने याच तत्त्वावर काम करीत सभासदांची आर्थिक पत वाढविली, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी केले. 

शेवगाव येथे माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन घुले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ऍड. शिवाजी काकडे, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे, रविराज गडाख, अरुण लांडे, बबन पवार, बबन भुसारी, अंबादास कळमकर, राजाजी बुधवंत, भाऊसाहेब चेके, डॉ. विकास बेडके, अप्पासाहेब शिंदे उपस्थित होते. नावीन्यपूर्ण अनेक उपक्रम राबवीत संस्थेने शंभर टक्के वसुली करून, राष्ट्रीयीकृत बॅंकेलाही हेवा वाटेल अशा ठेवी निर्माण केल्याचे घुले म्हणाले. पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब घुले यांनी प्रास्ताविक, तर नीलेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सत्यवान थोरे यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI on Inflation: दिवाळीत महागाईचा फटका बसणार? RBI गव्हर्नरांचा मोठा इशारा; कारण काय?

NCP Politics: मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

Haridwar: कांवड भक्तांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी; मुख्यमंत्र्यांनी पाय धुवून केले स्वागत, video viral

Latest Marathi News Live Update : विरोधकांनी रांचीमध्ये JPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांशी चर्चा केली का? भाजप खासदार जगदंबिका पाल यांचा सवाल

दोघात तिसरा! अमृता आणि हिमांशूच्या नात्यात 'त्या' व्यक्तीमुळे दुरावा? नेटकऱ्यांनी थेट अभिनेत्याचं नावच घेतलं; कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT