Promotion of eight teachers of Sangamner College as professors 
अहिल्यानगर

संगमनेर महाविद्यालयातील आठजण झाले प्रोफेसर

आनंद गायकवाड

संगमनेर ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदोन्नतीच्या पदासाठी विषयतज्ज्ञ व निवड समितीसमोरील मुलाखत व कुलगुरुंनी मान्य केलेला प्राध्यापक निवड समितीचा अहवाल यानुसार संगमनेर महाविद्यालयातील तब्बल आठ सहयोगी प्राध्यापकांना प्रोफेसरपदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

यात महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. रविंद्र ताशिलदार व डॉ. उमेश जगदाळे, मराठी विभागातील विभाग प्रमुख डॉ. अशोक लिंबेकर व डॉ. राहुल हांडे, अर्थशास्त्र विभागातील डॉ. गोरक्षनाथ सानप, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुवर्णा बेनके, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वंदना भवरे तसेच ग्रंथपाल डॉ. बबन चव्हाण यांचा समावेश आहे.

या पदावरील पदोन्नतीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेल्या नियमानुसार सहयोगी प्राध्यापक पीएच.डी. असणे व शोध पत्रिकेचे दहा लेख प्रकाशित होणे आवश्यक असते. या सर्व नियमांमध्ये पात्र झाल्यानंतरच ही पदोन्नती देण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, डॉ. अनिल राठी, सीए. नारायण कलंत्री, राजकुमार गांधी आदींसह शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

कौतुकाची बाब

एकाच वेळी तब्बल आठ सहयोगी प्राध्यापकांना प्रोफेसर पदावर पदोन्नती मिळणे, ही महाविद्यालयासाठी कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे. तसेच महाविद्यालयास मिळालेला स्वायत्त दर्जा या दोन्ही गोष्टींमुळे महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख आणखीच उंचावला आहे. 
-डॉ. संजय मालपाणी ( कार्याध्यक्ष )
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT