PSI Pallavi Gaikwad sakal
अहिल्यानगर

PSI Exam Result : जिद्द, परिश्रम अन् चिकाटीच्या बळावर ‘पल्लवी’ची आकाशाला गवसणी

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, परिश्रम अन् चिकाटीच्या बळावर तिने आकाशाला गवसणी घालत पोलिस निरीक्षक झाली.

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव दिघे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, परिश्रम अन् चिकाटीच्या बळावर तिने आकाशाला गवसणी घालत पोलिस निरीक्षक झाली आहे. करूले येथील पल्लवी राजेंद्र गायकवाड हिने हे नेत्रदीपक यश संपादन केले. आपल्या भाचीची मामाच्या गावात तळेगाव दिघे येथे वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

करूले (ता. संगमनेर) येथील शेतकरी कुटुंबातील पल्लवी गायकवाड हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश संपादन केले. पल्लवीच्या यशाने भारावलेल्या तळेगाव दिघे येथे तिच्या मामाच्या गावी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी फौजदार भाची पल्लवीची जल्लोषात मिरवणूक काढत आनंदोत्सव केला. यानंतर तिचा सत्कार सोहळा पार पडला.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती नामदेव दिघे, माजी सरपंच बाबासाहेब कांदळकर, प्रभारी सरपंच मयूर दिघे, आत्माराम जगताप, दिनकर जगताप, सुरेश जगताप, राजेंद्र गायकवाड, भागवत गायकवाड, राहुल जगताप, एकनाथ जगताप, कोमल जगताप, अतुल कदम, सुभाष जगताप, राजेश दिघे, बाबा जगताप आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आई - वडिलांनी माझ्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थकी ठरविला. स्वतःबरोबर त्यांचेही स्वप्न साकार केले. परिश्रम घेतल्यास यश मिळते.

- पल्लवी गायकवाड, पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT