PSI Kajal Aagre sakal
अहिल्यानगर

PSI Exam Result : टेम्पोचालकाची मुलगी झाली पोलिस उपनिरीक्षक

आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या टेम्पोचालकाची मुलगी पोलिस उपनिरीक्षक झाल्याने आग्रेवाडी ग्रामस्थांनी तिची गावातून भव्य काढली मिरवणूक.

सकाळ वृत्तसेवा

राहुरी - तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील आग्रेवाडी (म्हैसगाव) येथील काजल मच्छिंद्र आग्रे हिची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या टेम्पोचालकाची मुलगी पोलिस उपनिरीक्षक झाल्याने आग्रेवाडी ग्रामस्थांनी तिची गावातून भव्य मिरवणूक काढली.

काजल आग्रे हिने सन २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. तिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याचे जाहीर होताच मुळा व्हॅली पब्लिक स्कूलतर्फे (आग्रेवाडी) संस्थेचे अध्यक्ष संतोष माने यांनी काजलचा सत्कार केला. ग्रामस्थांनी काजलची सहकुटुंब मिरवणूक काढली. जेसीबीने काजलच्या डोक्यावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली.

तिने आग्रेवाडी जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, म्हैसगाव येथे केदारेश्‍वर विद्यालयात माध्यमिक शिक्षण, सात्रळ येथे कडू पाटील विद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण व प्रवरानगर येथे पद्मश्री विखे महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले. मुळा धरणात अडीच एकर जमीन संपादित झाल्याने अल्पभूधारक झालेले तिचे वडील मच्छिंद्र शिवराम आग्रे यांनी अनेक वर्षे दुसऱ्याच्या टेम्पोवर चालक म्हणून काम केले. आता ते स्वतःचा टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT