Public interest schemes are not being implemented as the government is not reviewing 
अहिल्यानगर

सरकार फेरआढावा घेत नसल्याने जनहिताच्या योजना कागदावरच : अण्णा हजारे 

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : सरकार जनहिताच्या अनेक योजना जाहीर करते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना आदेशही देते. मात्र, या योजना राबविल्या जातात की नाही, याचा फेरआढावा घेतला जात नाही. त्यामुळे योजना कागदावरच राहतात. त्यातून समाजाचे मोठे नुकसान होते, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. 

राज्यातील शीव- पाणंद रस्ते खुले करावेत, तसेच राज्यातील शेततलाव व बंधाऱ्यांची गळती थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी "आवाज दो' हे जनआंदोलन सुरू केले आहे. त्याच्या पत्रकाचे विमोचन हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

शीव-पाणंद रस्त्यांसोबत शेततलाव व बंधाऱ्यांची गळती थांबविण्यासाठी हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे प्लॅस्टिक पेपर अस्तरीकरणाचा प्रयोग राबविला. त्यातून बंधाऱ्यांमधील गळती मोठ्या प्रमाणात थांबली. हा प्रयोग राज्यभर राबवावा, तसेच शीवरस्ते खुले करावेत, या मागणीसाठी पवळे जनजागृती अभियान, तसेच सरकारला जाग यावी, यासाठी "आवाज दो' आंदोलन करीत आहेत. 

पवळे यांनी पूर्वीही तहसील कार्यालयासमोर अनेकदा आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले आहे. त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी त्यांनी नव्याने पुन्हा शीव-पाणंद रस्ते नवनिर्माण कृतिसमितीच्या माध्यमातून हे अभियान सुरू केले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT