Publication of three reference books in Dada Patil College 
अहिल्यानगर

दादा पाटील महाविद्यालयात तीन संदर्भ पुस्तकांचे प्रकाशन

नीलेश दिवटे

कर्जत : रयत शिक्षण संस्थेच्या येथील दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, प्रा. डॉ. प्रदीप जगताप व प्रा. अर्चना फुलारी यांनी लिहिलेल्या, "राजकीय विचारप्रणालींची ओळख,' "पाश्‍चिमात्य राजकीय विचार' आणि "राज्यशास्त्राची ओळख' अशा तीन क्रमिक व संदर्भ पुस्तकांचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर व बप्पासाहेब धांडे यांच्या हस्ते झाले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला वर्गासाठीच्या तृतीय सत्रासाठी, शैक्षणिक वर्ष 2020-21पासूनच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित ही क्रमिक व संदर्भ पुस्तके आहेत. पुणे येथील नामवंत डायमंड प्रकाशनाने ती प्रकाशित केली आहेत. प्राचार्य डॉ. कांबळे म्हणाले, ""अतिशय सुबोध व सुस्पष्ट भाषेत संबंधित अभ्यासक्रम व विषयाचे आकलन विद्यार्थ्यांना होईल. तसेच अभ्यासक, संशोधक व राजकीय कार्यकर्त्यांनाही ही पुस्तके मार्गदर्शक ठरतील.''

फाळके, पिसाळ, निंबाळकर व धांडे यांनी प्राचार्य डॉ. कांबळे, प्रा. डॉ. जगताप व प्रा. फुलारी यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ. जगताप यांनी आभार मानले. फुलारी यांच्याबरोबरच महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक कार्यक्रमास उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

Palghar Relief Hospital case: रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखे यांच्यासह २२ जणांना न्यायालयीन कोठडी; पोलिसांची अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

Sugar Factory Membership: कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासदत्व बंद; साखर आयुक्तांच्या परिपत्रकामुळे भीमाशंकर कारखान्याच्या प्रस्तावाला ब्रेक

MNLU Nagpur VC Appointment: डॉ. ज्योती भाकरे यांची नागपूरच्या 'महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी'च्या (MNLU) कुलगुरूपदी निवड

राहुल द्रविडच्या पोराची २११ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी,ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई! आर्यवीर सेहवागच्या पदार्पणात २८ धावा

SCROLL FOR NEXT