Punchnama will be held for the damage caused by Jayakwadi 
अहिल्यानगर

जायकवाडीमुळे झालेल्या नुकसानीचे होणार पंचनामे, शेतकऱ्यांना जीव भांड्यात

सचिन सातपुते

शेवगाव: जायकवाडी धरणाचे पाणी तालुक्यातील असंपादीत केलेल्या क्षेत्रात शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. या बाबत महसुल, जायकवाडी जलफुगवटा विभाग व कृषी विभाग यांनी आदेश काढून धरणग्रस्त भागातील शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

जायकवाडी धरणाचे पाणी गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील 22 गावातील संपादीत नसलेल्या शेत जमिनीत येत असल्याने पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. मागील वर्षी शेताततील उभ्या पिकात पाणी आल्याने शेतक-यांच्या हातून दोन्ही पिके गेली. त्यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले व दहिगाव ने परिसरातील शेतक-यांनी जायकवाडी प्राधिकरणविभागाकडे वर्षभर पाठपुरावा केला. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होवून पीक परिगणना तक्ता तयार करुन तो प्राधिकरणाकडे पाठवला. मात्र, शेतक-यांना अदयापही नुकसान भरपाई मिळालेली नाही.

या वर्षी जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठया प्रमाणात पाणी आल्याने ते पुन्हा शेतक-यांच्या असंपादीत शेत जमिनीमध्ये आले. त्यामुळे शेतक-यांची कपाशी, ऊस, कांदा, तुर, बाजरी या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. 

खरीप पिकांबरोबरच बागायती पिकांचेही नुकसान झाल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले. यावर्षी शेतक-यांनी एक महिन्यापासून पंचनामे करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडे निवेदने दिली. त्यानंतर शेवगावच्या तहसिलदार अर्चना भाकड यांनी जायकवाडी जलफुगवटा, कृषी व महसूल विभागातील कर्मचा-यांचे संयुक्त पथक नेमुण पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार क-हेटाकळी, खानापूर, एरंडगाव, दहिफळ, लाखेफळ, कर्जत खुर्द, ढोरहिंगणी, बोडखे, ताजनापूर, खुंटेफळ, दादेगाव, शेवगाव, खामगाव, हिंगणगावने, शहरटाकळी, ढोरसडे, देवटाकळी, दहिगांव ने, भाविनिमगाव, घेवरी व देवळाणे या गावातील जायकवाडीच्या पाण्यामुळे बाधीत झालेल्या पिकांचे पंचनामे तलाठी, कृषी सहाय्यक व मंडलाधिकारी यांच्या मार्फत केले जाणार आहे. 

२२ गावांचा प्रश्न

22 गावांचा परिसर मोठा असल्याने व अनेक भागातील पिकांत लांबपर्यंत पाणी आल्याने पंचनामे करण्यास बराच वेळ जाणार आहे. त्यानंतरही अनेक प्रशासकीय बाबी पुर्ण करुन शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या पंचनाम्याचे सर्व सोपस्कर पुर्ण होवूनही कृषी, महसूल विभाग व जायकवाडी प्राधिकरण यांच्यातील टोलवाटोलवीमुळे अद्यापि शेतक-यांच्या पदरी नुकसान भरपाईची रक्कम पडण्यास अडचण झाली.

 
वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार असंपादीत क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. संबंधीत गावातील शेतक-यांनी तलाठी, कृषी सहाय्यक व संबंधीत बीट प्रमुख यांच्याशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची नोंद दयावी.

-डॉ. क्षितीज घुले, सभापती, पंचायत समिती शेवगाव.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates :बीड अहिल्यानगर रेल्वे धावली

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT