A quarter of a crore rupees to Wambori Gram Panchayat from the auction of cheeks 
अहिल्यानगर

गाळ्यांच्या लिलावातून वांबोरी ग्रामपंचायत मालामाल

विलास कुलकर्णी

राहुरी : वांबोरी ग्रामपंचायत दिवसात कोट्याधीश झाली. गावातील 10 गाळ्यांच्या लिलावातून तब्बल 1 कोटी 65 लाख रुपयांची भर ग्रामपंचायतीच्या तिजोरीत पडली. 

वांबोरी येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जिल्ह्यात नावाजलेली जूनी व मोठी बाजारपेठ आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर मुख्य चौकात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लोकनेते रामनाथ वाघ शॉपिंग सेंटरमधील 10 गाळ्यांची लिलावप्रक्रिया काल (शुक्रवारी) झाली.

प्रत्येकी 25 हजार रुपये अनामत रक्कम भरून 74 ग्रामस्थांनी लिलावात भाग घेतला. सर्वाधिक 19 लाख 50 हजार रुपये, तर सर्वात कमी 14 लाख 51 हजार रुपयांची बोली लागली. 10 गाळ्यांच्या लिलावातून ग्रामपंचायतीला 1 कोटी 65 लाख 11 हजार रुपये मिळाले. 

ऍड. सुभाष पाटील व डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनखाली दोन वर्षांपूर्वी शॉपिंग सेंटरचे बांधकाम तत्कालीन सदस्य मंडळाने केले. सरपंच किरण ससाणे, उपसरपंच मंदा भिटे, सहायक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, शाखा अभियंता ए. आर. पाटील, विस्तार अधिकारी बापूसाहेब फुगारे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गागरे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT