राहुरी खतासाठी रांगा SYSTEM
अहिल्यानगर

खतांसाठी दुकानांसमोर महिलांच्या लागल्या रांगा

विलास कुलकर्णी

राहुरी : तालुक्यात कृषी विभागाच्या अंदाजानुसार खरिपात ३० हजार ४०० हेक्टरवर पेरण्या अपेक्षित आहेत. यंदा पावसाने ओढ दिल्याने तुरळक पावसावर आतापर्यंत एक हजार ६६० हेक्टर (साडेपाच टक्के) पेरण्या झाल्या आहेत. उगवण झालेल्या पिकांना खतांची गरज भासत आहे. परंतु, युरियाच्या टंचाईमुळे खतांच्या दुकानांसमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. महिला शेतकऱ्यांनाही रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचे निर्बंध कायम आहेत. परंतु, रासायनिक खतांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना नाविलाजाने खतांच्या दुकानांसमोर भल्या पहाटेपासून रांग लावण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाने यंदा खरीप हंगामासाठी तालुक्यात २३ हजार २१ टन खतांची मागणी नोंदविली. कृषी आयुक्तालयाने १९ हजार ५७ टन रासायनिक खते मंजूर केली. (Queue of women for fertilizers in Rahuri)

युरियाच्या नऊ हजार ६४५ टनांच्या मागणीपैकी सात हजार ३९२ टनांस मंजुरी मिळाली. मंजूर आवंटनाच्या ४० टक्के (तीन हजार टन) युरिया तालुक्यात पोहोचला. पैकी ५०० टन युरिया बफर स्टॉक करण्यात आला. उर्वरित अडीच हजार पैकी सध्या २५० टन युरियाचा साठा विक्रीसाठी शिल्लक आहे. कृषी खात्याने एका शेतकऱ्याला एकाच दिवशी युरियाच्या जास्तीत जास्त दोन गोण्या विक्रीचे बंधन घातले आहे. त्यामुळे, जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. युरिया टंचाईच्या भीतीने शेतकरी घरातील महिलांसह खतांच्या दुकानांसमोर रांगा लावतांना दिसत आहेत.

तालुक्यात दोन दिवसांआड २०० ते ३०० टन युरियाचा पुरवठा होत आहे. काळाबाजार रोखण्यासाठी एका शेतकऱ्याला युरियाच्या दोन गोण्या देण्याचे बंधन घातले आहे. काही शेतकरी रब्बी हंगामासाठी युरियाचा साठा करीत आहेत. शेतकऱ्यांनी जास्तीचा साठा करू नये. तालुक्यात युरियाची टंचाई भासणार नाही.

- महेंद्र ठोकळे, तालुका कृषी अधिकारी, राहुरी.

(Queue of women for fertilizers in Rahuri)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT