Queues for liquor up to one kilometer in Ahmednagar 
अहिल्यानगर

VIDEO : नगरमध्ये मद्यवार उजाडला अन दारूसाठी उडाली झुंबड...एक किलोमीटरपर्यंत रांगा

सकाळ वृत्तसेवा

नगर - ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो क्षण आलाच. नगर जिल्ह्यात आज मंगळवार नव्हे मद्यवार उजाडला. चातकाप्रमाणे या दिवसाची वाट मद्यपींकडून पाहिली जात होती. सकाळपासूनच त्यांनी वाईन शॉप्ससमोर रांगा लावल्या होत्या.

कालपासून नगरमधील लॉकडाउन शिथिल झाला आहे. भाजीबाजार, धान्यबाजार किंवा किराणा दुकानांमध्ये नाही एवढी गर्दी दारूच्या दुकानांसमोर होती. जणू काही अमृताचे वाटप होत असल्यासारखे लोकांनी भल्या सकाळपासून दुकानांसमोर थंगारी लावली होती.

सकाळी दहा वाजता वाईन शॉप्स उघडले. मात्र, त्यापूर्वीच दुकानांसमोर तोबा गर्दी झाली होती. प्रत्येकाला वाटत होतं आपला नंबर कधी येईल. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मद्यपानाची आतुरता दिसत होती.

बाउन्सरचा बंदोबस्त

दुकानदारांनीही कालपासून सोशल डिस्टन्सिंगसाठी पट्टे ओढून ठेवले होते. काहींनी चौकोन आखले होते. उगाच गडबड गोंधळ होऊ नये म्हणून काही वाईन शॉप्स मालकांनी बाउन्सर आणले होते. प्रत्येकजण नम्रपणे रांगत उभा राहिला होता. जे कधी मंदिरासमोर रांगेत उभे राहिले नाही, अशांचाच रांगेत जास्त भरणा होता.

कोण होते खरेदीदार

अहमदनगरमध्ये दारू खरेदी करणाऱ्यांमध्ये मध्यम वर्गीय जास्त होते. त्यातल्या त्यात तरूणांची संख्या लक्षणीय होती. ज्येष्ठांनीही दारूच्या दुकानासमोरील रांगेत पथारी मारली होती. मजुरांचा भरणा सर्वाधिक होता.

क्वॉर्टर नको खंबा द्या

वाईन शॉप्समालकांनी ग्राहकांची काळजी घेतलेली दिसत होती. प्रत्येकाला सॅनिटायझर दिले जात होते. पाण्याचीही सोय केली होती. तर काहींनी थर्मल चेकिंगही केले. एका व्यक्तीला चार बाटल्या दिल्या जात होत्या. आपापल्य कुवतीप्रमाणे दारूची खरेदी केली जात होती. मात्र, सर्वाधिक भरणा खंबा घेण्यावर होता. काही दुकानांसमोर एकेक किलोमीटरपर्यंत ही रांग होती. महामार्गावरील वाईन शॉप्समुळे रस्त्यावर गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईकरांनो आनंदाची बातमी! जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड सुस्साट होणार, मार्गावरील मोठा अडथळा पालिकेने दूर केला

IND vs AUS 1st T20I: ओव्हर्स कमी होण्यामागे पाऊस नव्हे, तर भलतंच कारण! तुम्हाला कळलं तर म्हणाल, आमच्या इथे असं कधी होत नाही...

November Horoscope Marathi : नोव्हेंबरमध्ये 'या' 3 राशींच्या लोकांना त्रासयोग; यात तुमची रास तर नाही ना? पाहा अन् करा सोपा उपाय

थिएटरमध्ये थंड प्रतिसाद पण ॲमेझॉन प्राईमवर Trend होतोय उमेश-प्रियाचा सिनेमा ! टीमने व्यक्त केला आनंद

Ravina Gaikwad : उत्कृष्ट कामगिरी! शेतमजुराच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डंका; वणीच्या रवीना गायकवाडने पटकावले १० हजार मीटरमध्ये रौप्यपदक

SCROLL FOR NEXT