

CIDCO Home Loan Limit
ESakal
सिडकोने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेतला आहे. संस्थेने कमाल गृहकर्ज मर्यादा ₹५० लाखांवरून ₹१ कोटींपर्यंत वाढवली असून कर्मचाऱ्यांना घर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. हा प्रस्ताव ११ मार्च रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन मंडळाने त्यास मंजुरी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी १९८९ च्या सिडको कर्मचारी कर्ज कायद्यात आवश्यक दुरुस्त्याही करण्यात आल्या आहेत.