Radhakrishna Vikhe sakal
अहिल्यानगर

Radhakrishna Vikhe : राऊतांकडून दिशाभूल करणारी विधाने; मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलेल्या व्यक्तीचे भांडवल नको

मराठा आरक्षणाच्‍या बाबतीत सरकारच्‍या शिष्‍टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्‍याशी सकारात्‍मक चर्चा केली.

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी - ‘‘मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याबाबत वादग्रस्त आणि दिशाभूल करणारी विधाने खासदार संजय राऊत यांनी करू नयेत. महाविकास आघाडीच्‍या काळात सचिन वाझे ‘मातोश्री’ आणि ‘वर्षा’वर काय करीत होते, याचा खुलासा त्यांनी करावा, अशी खोचक प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

लोणी येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्‍या काळात अनेक गैरव्यवहार झाले. त्यातील बरेच आरोपी कधी ‘मातोश्री’, तर कधी ‘वर्षा’वर आणि मंत्र्यांच्‍या बंगल्‍यावर दिसत असायचे.

भेटायला येणाऱ्या प्रत्‍येकाचीच माहिती मुख्‍यमंत्री किंवा मंत्र्यांना नसते. मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यावर गेलेल्‍या व्‍यक्तीबाबत एवढे भांडवल करण्‍याची आवश्‍यकता नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात सचिन वाझे कुठे कुठे फि‍रत होते, कसे खंडणी गोळा करायचे, त्यांना ‘टार्गेट’ कोण देत होते, याबाबत राऊत गप्‍प का आहेत?,

असा सवाल त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्‍या बाबतीत सरकारच्‍या शिष्‍टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्‍याशी सकारात्‍मक चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच सर्वांची भावना आहे. तत्कालीन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांच्‍या हलगर्जीपणामुळेच गेले, असा आरोप विखे पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT