राधाकृष्ण विखे पाटील ई सकाळ
अहिल्यानगर

निळवंडेसाठी निधीची तरतूद का नाही? - राधाकृष्ण विखे पाटील

सकाळ डिजिटल टीम

शिर्डी (जि. अहमदनगर) : निळवंडे कालव्यांच्या उर्वरित कामांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्याऐवजी लाभक्षेत्रातील एक मंत्री स्वतःच्या स्वाक्षरीचे फ्लेक्स लावून दुष्काळी भागाला पाणी देणार असल्याची जाहिरात करतात. समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना मूग गिळून गप्प बसतात, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.


केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना. तसेच साखर व इथेनॉलचे दर निश्चित करून उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचेही ते म्हणाले. पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, उपाध्यक्ष विश्वासराव कडू, माजी अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक म्हसे, नंदकुमार राठी यांच्यासह संचालक आणि सभासद ऑनलाइन सभेत सहभागी झाले होते.

विखे पाटील म्हणाले, ‘‘सहकारी साखर कारखानदारीचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाचा फायदा होईल. निळवंडे कालव्यांच्या कामासाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची गरज असताना, महाविकास आघाडी सरकारने निधीची तरतूद केलेली नाही.’’ केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे त्याचा कार्यभार दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी माजी मंत्री म्हस्के यांचेही भाषण झाले.


‘‘यंदाच्या गळीत हंगामात गणेश, राहुरी व प्रवरा हे तीनही कारखाने पूर्ण क्षमतेने चालविले जातील. ऊसउत्पादक व सभासदांचे हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतले जातील. त्यादृष्टीने पूर्वतयारीची कामे सुरू झाली आहेत.’’

- डॉ. सुजय विखे पाटील, खासदार, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सकाळी स्वस्त असलेलं सोनं-चांदी ट्रम्पला निवडणुकीत धक्का मिळताच महागलं! काही तासांतच हजारोंची वाढ; ताजा दर किती?

पुण्यात एसटीचा अजब कारभार! कॅशलेसचा गाजावाजा, पण आरक्षणासाठी रोख रकमेचाच आग्रह; प्रवाशांची दिवाळीआधीच गैरसोय

मुंबईतली ६ हजार रुपये भाड्याची खोली, पाय दुमडून झोपावं लागतं; अख्खं कुटुंब राहतं, VIDEO VIRAL

Illegal Clinic Case: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; पिंपोडे बुद्रुक येथील 'शुभम क्लिनिक' हा बोगस दवाखाना सुरू ठेवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : ऊस दर प्रश्न शेतकरी आणि कारखानदारांमधला, सरकार मध्यस्थ : फडणवीस

SCROLL FOR NEXT