Rahuri is adulterating milk
Rahuri is adulterating milk 
अहमदनगर

राहुरीत अशी होते दुधात भेसळ, अन्न औषध प्रशासनाने केली पोलखोल

विलास कुलकर्णी

राहुरी : चंडकापूर (ता. राहुरी) येथे जय भवानी दूध संकलन केंद्रावर नगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. भेसळयुक्त दूध व दूध भेसळीच्या रसायनांचा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

भेसळयुक्त दुधाचे व रसायनांचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन, ५३२ लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. दूध केंद्र सील करून, दूध केंद्राचा परवाना त्वरित निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली.

आज (गुरुवारी) सकाळी नऊ वाजता चंडकापूर येथे नगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुटे, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांच्या पथकाने छापा टाकून, कारवाईचा बडगा उगारला. 

राजेंद्र चांगदेव जरे यांच्या जय भवानी दूध संकलन केंद्राच्या ठिकाणी व राहत्या घरामध्ये दूध भेसळीसाठी साठवलेली २५ किलो व्हे पावडर, १५२ किलो लिक्विड पॅराफीन, ५३२ लिटर भेसळयुक्त दूध असा तीस हजार २४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

जप्त मुद्देमालाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. भेसळयुक्त ५३२ लिटर दूध जागेवर ओतून नष्ट करण्यात आले. दूध केंद्राचा परवाना त्वरित निलंबित करून, पथकाने दूध केंद्र सील केले. 

'सकाळ' शी बोलतांना सहाय्यक आयुक्त शिंदे म्हणाले, "राजेंद्र जरे हा दररोज ८०० लिटर दूध शेतकऱ्यांकडून संकलित करायचा. त्यामध्ये कृत्रिम तयार केलेले २०० लिटर दूध मिश्रण करून, दररोज एक हजार लिटर भेसळयुक्त दूध पुढे विक्री करायचा. अशी गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या नगर कार्यालयाला मिळाली. त्यानुसार, जरे यांच्या जय भवानी दूध संकलन केंद्रावर छापा टाकून कारवाई केली."

अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT