In Rahuri after 37 prisoners now eight police are also corona positive 
अहिल्यानगर

राहुरीत ३७ कैद्यांपाठोपाठ आता आठ पोलिसही कोरोनाबाधित

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरी कारागृहातील ३७ कैदी गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापाठोपाठ आठ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, आता पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सात- आठ पोलिस आजारी असूनही कामावर आहेत. त्यामुळे, एखाद्या पोलिस कर्मचार्‍याच्या जीवावर बेतण्याची व कोरोना संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी गरज असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

राहुरी तालुक्यातील अवैध धंदे, घरफोड्या, दुचाकी चोर्‍या, वाढती गुन्हेगारी,‌ भरदिवसा पडणारे खून, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा जिल्हाभर गाजत आहे. सामान्य नागरिक, महिला, मुली यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.  पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या निष्क्रिय कारभाराचा फटका सर्वच घटकांना बसत आहे. त्यांच्या हेकेखोर, बेफिकीर, मनमानी वृत्तीमुळे कारागृहातील तब्बल ३७ कैदी गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोना लॉकडाऊन काळात जीवाची बाजी लावून, दिवस- रात्र काम करणारे पोलिस कर्मचारी पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या तुसड्या वागणुकीला कंटाळले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यावेळी कोरोना संक्रमण वाढले नव्हते. त्यानंतर कारागृहातील कैदी कोरोना बाधित आढळण्यास सुरुवात झाली. कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले.  परंतु, सर्व अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांची पुन्हा कोरोना तपासणी करण्यात आली नाही. ज्यांना त्रास होतो. ते स्वतःकोरोना तपासणी करुन घेऊ लागले. 

कोरोना बाधित होऊन, नंतर कोरोना मुक्त झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे स्वागत होते. परंतु, राहुरी पोलिस ठाण्यात कोरोना बाधित झाले. किंवा बरे होऊन कामावर रुजू झाले. तरी, त्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्येही नैराश्य पसरले आहे.

राहुरी पोलिस ठाण्यातील आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उपचार घेत आहेत.  सात-आठ कर्मचारी आजारी आहेत. परंतु, कामाच्या व्यापामुळे त्यांनी कोरोना तपासणी केली नाही. अशीच परिस्थिती राहिली. तर, भविष्यात एखाद्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतण्याची भीती पोलिस वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची कोरोना तपासणी होण्याची गरज व्यक्त होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT