Rahuri Agricultural University Sale of 4 Tons Onion seeds 6 tons leftover ahmednagar sakal
अहिल्यानगर

कृषि विद्यापीठाचे ४ टन कांदा बियाणे विक्री; ६.७ टन कांदा बियाणे अद्याप शिल्लक

फुले अॅग्रोमार्ट ऑनलाईन पोर्टलद्वारे कांदा बियाणे विक्री सुरु, १५०० च्या वर शेतकर्यांनी खरेदी केले कृषि विद्यापीठाचे कांदा बियाणे

सकाळ वृत्तसेवा

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कांदा बियाण्याची विक्री ऑनलाईन पोर्टलद्वारे दोन दिवसापूर्वी सुरु केली आहे. कृषी विद्यापीठाने विकसीत केलेले कांद्याचे फुले समर्थ आणि बसवंत ७८० या वाणांना शेतकर्यांची प्रथम पसंती असल्याने या वर्षी विद्यापीठने १०.७ टन (१०७ क्विंटल) कांदा बियाण्याचे उत्पादन घेतलेले आहे. पहिल्या दिवशी २.५ टन कांदा बियाण्याची ऑनलाईन विक्री झाली आहे. दुसर्या दिवशी १.५ टन कांदा बियाण्याची विक्री झाली असून ६.७ टन कांदा बियाणे शिल्लक आहे. राज्याच्या काही भागात अजून पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी कांदा बियाणे खरेदिकडे वळालेले नाही. आत्तापर्यंत झालेल्या ऑनलाईन विक्रीमध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, मालेगांव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबद, बीड, अकोला, रत्नागिरी, ठाणे, या जिल्ह्यांतील शेतकर्यांनी कांदा बियाणे खरेदी केले आहे.

कांदा बियाण्यांसाठी ज्या शेतकर्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करुन पैसे भरलेले असतील अशा शेतकर्यांना हे बियाणे त्यांनी दिलेल्या पर्यायानुसार कृषि विज्ञान केंद्र, धुळे, कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव, पिंपळगाव बसवंत संशोधन केंद्र आणि राहुरी कृषि विद्यापीठाच्या विक्री केंद्रावर उपलब्ध होईल. ज्या शेतकर्यांनी कांदा बियाणेसाठी फुले अॅग्रोमार्ट पोर्टलवर नोंदणी केलेली आहे व नोंदणीवेळी जे कागदपत्रे पोर्टलवर जमा केले आहे त्या कागदपत्रांची झेरॉक्स आणि पैसे भरल्याची पावती बियाणे घेतांना विक्री केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी कांदा बियाणे खरेदी करण्याचे आवाहन संचालक संशोधन डॉ. शरद गडाख आणि बियाणे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आयुक्त मुंढे रूजू झाल्यापासून वाढल्या कारवाया, अन्न पदार्थांच्या नमुन्यांमुळे लॅब हाऊसफुल्ल; १४ दिवसांत अपेक्षित असलेला अहवाल मिळतोय १०० दिवसांनी

ढिंग टांग : विमान उडते अधांतरी..!

Ketan Agrawal Murder Case: धक्कादायक खुलासा ! साखरपुड्याआधी चेतनसोबत राजस्थान ट्रीपवर गेली होती सिया; तिथेच शिजला भावी नवऱ्याच्या हत्येचा कट

म्युच्युअल फंड : मल्टी कॅप गुंतवणुकीची जादू!

आजचे पंचांग 29 जून 2026! वटपौर्णिमा, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष

SCROLL FOR NEXT