जप्त केलेले गावठी पिस्तूल.
जप्त केलेले गावठी पिस्तूल. sakal
अहमदनगर

गावठी पिस्तूल काडतुसांसह दोघांना राहुरी येथून अटक

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राहुरी बसस्थानक परिसरात सापळा रचून सराईत दोन गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे, असा ३१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नवनाथ साहेबराव गोर्डे (रा. पोहेगाव, ता. कोपरगाव), समाधान बाबासाहेब चव्हाण (रा. कोपरगाव बेट), अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना राहुरी बसस्थानक परिसरात दोन जण पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ राहुरी परिसरात गस्तीवर असलेल्या त्यांच्या पथकाला कारवाईची सूचना केली. पथकाने दोन पंचांसह बसस्थानक परिसरात सापळा लावला.

काही वेळाने दोन जण संशयितरीत्या आजूबाजूला टेहळणी करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. खात्री पटताच पथकाने त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची अंगझडती घेतल्यावर गोर्डे याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल व जिवंत दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल रोहित येमूल यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गोर्डेवर १२ गुन्हे

नवनाथ गोर्डे याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी, आर्म ॲक्ट व अवैध दारूविक्री, असे गंभीर स्वरूपाचे बारा गुन्हे दाखल आहेत. समाधान चव्हाण याच्याविरुद्धही गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT