Rahuri University advises farmers to plant new varieties of sugarcane 
अहिल्यानगर

उसाचे फुले वाण देते एकरी ११८ टनाचा उतारा, राहुरी विद्यापीठाचा लागवडीचा सल्ला

रहिमान शेख

राहुरी विद्यापीठ : अखिल भारतीय समन्वित ऊससंशोधन प्रकल्पाची 33वी राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मध्यवर्ती ऊससंशोधन केंद्र, पाडेगाव येथे विकसित केलेल्या, "फुले 10001' या लवकर पक्व होणाऱ्या वाणाची, राष्ट्रीय पातळीवर केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात येथे लागवडीसाठी, कार्यशाळेत शिफारस करण्यात आली. 

"फुले 265' आणि "एमएस-602' या दोन वाणांचा संकर करून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथेच निर्माण केलेला हा पहिलाच ऊस वाण असून, तो द्वीपकल्पीय विभागातील 34 चाचण्यांमध्ये कोसी 671 आणि को 86032पेक्षा ऊस आणि साखरउत्पादनात सरस ठरला आहे.

द्वीपकल्पीय विभागातील 14 वेगवेगळ्या संशोधन केंद्रांवर घेतलेल्या एकूण 34 प्रयोगांत (प्रथम, द्वितीय पीक व खोडवा) "फुले 10001' वाणाचे हेक्‍टरी ऊसउत्पादन 118.51 टन, तर साखरउत्पादन 16.84 टन मिळाले आहे. 

"फुले 10001' वाणाच्या उसाची पाने रुंद आणि गर्द हिरवी असून, पानांच्या देठावर कुस नाही. ऊस जाड, मऊ आणि कांड्या सरळ आहेत. तुऱ्याचे प्रमाण अल्प आहे. हा वाण खोडकीड, कांडीकीड, पिठ्या ढेकूण, शेंडेकीड यांना मध्यम प्रतिकारक आहे.

तांबेरा, तपकिरी ठिपके आणि काणी रोगास प्रतिकारक असून, मर आणि लालकूज रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. या वाणाची निर्मिती आणि प्रसारित करण्यात माजी ऊस विशेषज्ञ व ऊस पैदासकार डॉ. एस. एम. पवार, ऊस विशेषज्ञ डॉ. भारत रासकर, ऊस पैदासकार डॉ. आर. एम. गारकर, माजी ऊस पैदासकार डॉ. डी. ई. कदम, तसेच कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. डी. एस. थोरवे यांचे योगदान आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT