Crime  esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : भालगावला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा; १२ जण अटकेत

जुगारअड्ड्यावर सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

सकाळ डिजिटल टीम

पाथर्डी - तालुक्यातील भालगाव येथे सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १२ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.आजिनाथ कुंडलिक खेडकर (रा. घाटशीळ पारगाव), ज्ञानेश्वर हरिभाऊ ढाकणे (रा. बावी), दत्ता अण्णासाहेब तांबे (रा. राक्षसभुवन), भगवान विष्णू आंधळे (रा. बावी), विष्णू एकनाथ पवार (रा. झापेवाडी), शिवाजी लक्ष्मण म्हस्के (रा. आनंदगाव),

भगवान दगडू ढाकणे (रा. बावी), अन्वर इस्माईल शेख (रा. शिरूर कासार), पोपट रामनाथ विघ्ने (रा. आनंदगाव), बाळू रघुनाथ गायकवाड (रा. शिरूर कासार), गिन्यानदेव तुकाराम भोसले (रा. झापवाडी) व बाळासाहेब कोंडिराम घोरपडे (ता. शिरूर कासार) अशी आरोपींची नावे असून, ते बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आहेत.

आजिनाथ कुंडलिक खेडकर हा पाथर्डी तालुक्यातील भालगाव उकांडा फाटा येथील हॉटेल राजगडच्या पाठीमागे जुगारअड्डा चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. आरोपींकडून चार लाख ६२ हजार ४३० रुपये किमतीचे मोबाईल, मोटारसायकल, रोख रक्कम व जुगाराची साधने हस्तगत करण्यात आली आहेत. पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी अशोक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT