A raid on a gambling den near the post office in Nevasa 
अहिल्यानगर

नेवासा फाट्यावरील टपाल कार्यालयाजवळ जुगार अड्ड्यावर छापा

सुनील गर्जे

नेवासे : नेवासे फाटा येथील टपाल कार्यालय परिसरातील एका इमारतीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्डयावर नेवासे पोलिसांनी छापा टाकून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख राकमेसह एक लाख 67 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे पोलिसांनी जुगार अड्यावर केलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिस निरीक्षक विजय करे यांना मिळालेल्या माहितीवरून नेवासे पोलिसांनी नेवासे फाटा येथील टपाल कार्यालय परिसरात एका इमारतीच्या आडोशाला छापा टाकून राहुल जनार्धन लाड (वय 28), रशीद मुस्तफा शेख (वय 30), गणेश लक्ष्मण गायकवाड (वय 25) दत्तात्रेय गोरख साळवे (वय 24), आकाश अनिल गायकवाड (वय 27), अदिनाथ शेटीबा धनवटे (वय 25), इलेश संजय साळवे (वय 22) संदीप सुर्यभान धनगर (वय 27, सर्व रा. नेवासे फाटा ता. नेवासे) या आठ जुगाऱ्यानां पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्याकडे रोख रक्कम व सात विविध कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट तसेच तीन दुचाकी मोटार सायकल असा एक लाख 67 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल आणि तीरट नावाचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT