सांगली : शहरातील एका महिलेशी सोशल मीडियावरून संपर्क साधून तिला जाळ्यात ओढून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. छायाचित्रे व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेकडून १७ लाख रुपये उकळले. याप्रकरणी इम्रान अब्बास पखाली (वय २९, रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) याला अटक केली.