Rajinikanth surprises fans by arriving in an auto rickshaw
esakal
RAJINIKANTH SURPRISES FANS WITH HUMBLE AUTO RICKSHAW ARRIVAL: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्यांचा अभिनय, साधेपणा सगळंकाही चाहत्यांना प्रचंड आवडतं. रजनीकांत यांना दाक्षिणात्य भागात चाहते देव मानतात. दरम्यान अशातच त्यांच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलय. ते सध्या म्हैसूरमध्ये शूटिंग करत आहे. त्यावेळी लोकेशन ठिकाणी पोहचताच त्यांनी चक्क रिक्षातून येत चाहत्यांची भेट घेतली. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.