

Toll Hike
ESakal
मुंबई : मुंबईत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांना आजपासून (ता. १) वाढीव पथकर मोजावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शहराच्या प्रवेशद्वारांवरील पाचही नाक्यांवरील पथकरात सुमारे २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ मिनी बस, हलकी व्यावसायिक वाहने, ट्रक, बस आणि अवजड वाहनांसाठी लागू असणार आहे.