Rajendra Nagwade attended the program of ncp ghanshyam shelar at shrigonda SYSTEM
अहिल्यानगर

श्रीगोंद्यात शेलार-नागवडेंचे राजकीय पॅच-अप

संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि. नगर) : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार यांनी शहरात सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाच्या उद्‍घाटनाला, काँग्रेसचे नेते आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासोबत नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म मोडून नागवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शेलार हे आघाडीचे उमेदवार होते व नागवडे यांच्या विरोधाने त्यांचा पराभव झाल्याची मोठी चर्चा होती. शेलार यांनीही अनेक वेळा पराभवाचे खापर नागवडे यांच्यावर फोडले आहे. आज हे दोघे एकत्र आल्याने, त्यांचे मिटले असल्याची चर्चा आहे.

शहरात शेलार यांनी पक्षाचे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्याचे उद्‍घाटन आज राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष वर्षा शिवले यांच्या हस्ते झाले. मात्र, यावेळी डॉ. तांबे व राजेंद्र नागवडे यांची उपस्थिती राहिली. त्यातच नागवडे यांची हजेरी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शेलार यांनी नागवडे यांच्याविषयी थेट नाराजी व्यक्त करीत, कारखाना निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध फिल्डिंग लावण्यासाठी अनेक बैठकाही घेतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांनी अनपेक्षितपणे भाजपमध्ये प्रवेश केला. शेलार यांना आघाडीची उमेदवारी होती व त्यांचा निसटता पराभव झाला. नागवडे सोबत असते अथवा शांत राहिले असते, तरी त्यांना विजय मिळाला असता, अशी चर्चा शेलार समर्थक करीत होते.

शेलार समर्थक कारखाना निवडणुकीत विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत. शेलार यांनी नागवडे यांचे विरोधक असणारे केशव मगर यांच्यासमवेत रणनीती ठरविण्यासाठी बैठकाही घेतल्या. दरम्यानच्या काळात पंचायत समिती निवडणुकीत मगर समर्थक जिजाबापू शिंदे हे आमदार बबनराव पाचपुते यांच्यासोबत गेल्याने शेलार दुखावले गेले. त्यातच आज नागवडे यांनी शेलार यांच्या कार्यालयाच्या उद्‍घाटनाला हजेरी लावत फोटोसेशन केल्याने चर्चा रंगली. भविष्यात हे दोघे एकत्र दिसण्याची शक्यता वाढली आहे.

आमदार डॉ. तांबे हे आपणाला भेटण्यासाठी आले होते. योगायोगाने संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन होते तेथेच ते आले. त्यांच्या समवेत नागवडेही आले होते.

- घनश्‍याम शेलार, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

SCROLL FOR NEXT