nana patole Team eSakal
अहिल्यानगर

शिर्डीतून राजेंद्र वाघमारेंच्या उमेदवारीसाठी पटोलेंना साकडं; आयात उमेदवार न देण्याचीही मागणी

सकाळ डिजिटल टीम

नेवासे फाटा : शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये यापूर्वी काँग्रेसने दिलेले आयात उमेदवार पक्षाशी गद्दारी करत भाजपमध्ये गेले त्यामुळे आयात उमेदवार न देता यावेळी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यालाच पक्षाने उमेदवारी द्यावी तसेच या मतदार संघात राजेंद्र वाघमारे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आली.

शिर्डी लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून तो काँग्रेसलाच मिळावा व काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे यांना या मतदार संघातून पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी असे साकडे आज जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांना घालण्यात आले.

मुंबई येथील काँग्रेस टिळकभवन कार्यालयात आगामी लोकसभा निवडणुका,पक्ष संघटन आढावा तसेच संविधान सुरक्षा अशा अनेक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,काँग्रेसचे राष्ट्रिय नेते मुकुल वासनिक,मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड,अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.

अहमदनगर जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्यावतीने शिर्डी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसला मिळावा व या मतदार संघातून अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसलाच राहील व वेळ पडल्यास काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढेल असेही स्पष्ट केले. तसेच कोणतीही वाट न बघता काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे असा सूचक सल्लाही दिला.

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी असे लेखी निवेदन अनुसूचित जाती विभागाकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले. याप्रसंगी अनुसूचित जाती विभाग प्रदेश कमिटीचे बंटी यादव,संजय भोसले,जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष गायकवाड,नेवासा काँग्रेसचे संभाजी माळवदे,सचिन बोर्डे,संदीप मोटे,किरण साठे यांसह जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे बारामती विमान दुर्घटनेतील मृत पिंकी माळीच्या निवासस्थानी दाखल होणार

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT