Flamingo milk also gave a good price in lockdown 
अहिल्यानगर

लॉकडाउनमध्येही राजहंस दूध संघाने शेतकऱ्यांना उच्चांकी भाव दिला

आनंद गायकवाड

संगमनेर ः लॉकडाऊनच्या कठीण काळात खासगी संस्थांनी दूध स्वीकारणे बंद केले. मात्र राजहंस दूध संघाने याही काळात स्वीकारून दूध उत्पादकांना दिलासा दिला. अडचणीच्या काळात "राजहंस'ने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

थोरात कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण पार पडली. त्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते. 

थोरात म्हणाले, कोरोनामुळे मागील वर्षात सर्व व्यवहार ठप्प होते. या काळात सामान्यांशी बांधिलकी जपणाऱ्या राजहंस संघाने दूध उत्पादकांच्या हितासाठी एक दिवसही दूध संकलन बंद ठेवले नाही. शिवाय 25 रुपये उच्चांकी भाव दिला. संघामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात समृद्धी निर्माण झाली आहे. 

देशमुख म्हणाले, राजहंस अर्थसाह्य योजनेंतर्गत तालुक्‍यातील दूध उत्पादकांना गायी व गोठ्यांसाठी बॅंकांच्या सहकार्यातून कमी दरात कर्ज देण्यात येणार आहे. तसेच स्वस्त औषधांची दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. राजहंसने नवीन उपपदार्थांची निर्मिती सुरू केली आहे. 
आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, ऍड. माधवराव कानवडे, इंद्रजित थोरात, बाबा ओहोळ, शिवाजीराव थोरात, शंकर खेमनर, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, अजय फटांगरे, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, जी. एस. शिंदे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheesh Mahal Delhi: दिल्लीतील 370 वर्षे जुने 'शीशमहाल' अखेर उघडले! जाणून घ्या तिकिट, वेळ आणि विशेष माहिती

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2025

मोठी बातमी! सोलापूर जिल्हा बॅंकेचे ६ शाखाधिकारी निलंबित; बनावट सोन्यावर दिले लाखोंचे कर्ज; माळशिरस, मंगळवेढा, सांगोल्यातील शाखांमधील धक्कादायक प्रकार

Panchang 11 July 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

व्रत आरोग्याचे!

SCROLL FOR NEXT