Rajini Bharat Belhekar stands first in Bhagavad Gita recitation competition Sakal
अहिल्यानगर

Bhagavad Gita Recitation : भगवद्‍गीता पाठांतर स्पर्धेत देशात ‘रजनी’ प्रथम

कर्नाटक राज्यातील श्रृंगिरी शक्तीपिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या भगवद्‍गीता पाठांतर विषयांवरील प्रश्नमंजूषा स्पर्धेत सोनई येथील रजनी भरत बेल्हेकर यांनी देशात पहिला क्रमांक मिळवला.

विनायक दरंदले

सोनई : कर्नाटक राज्यातील श्रृंगिरी शक्तीपिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या भगवद्‍गीता पाठांतर विषयांवरील प्रश्नमंजूषा स्पर्धेत सोनई येथील रजनी भरत बेल्हेकर यांनी देशात पहिला क्रमांक मिळवला. प्रशस्तीपत्र व एकवीस हजार रुपयांचे बक्षीस मिळविले आहे. त्यांनी मागील वर्षी गीता परिवार आयोजित स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. बेल्हेकर मुळा एज्युकेशन संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका आहेत.

अयोध्या मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या गीता परिवाराचे कार्य जगातील एकशे दहा देशात व तेरा भाषेत सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी काम पहात आहेत.

कोरोना काळात झूम ॲप अधिक प्रसिद्ध झाल्यानंतर रजनी बेल्हेकर यांनी गीता परिवारात सहभाग घेऊन श्लोक पाठांतर करण्यास सुरुवात केली होती. तीन वर्षांनंतर त्यांनी पूर्ण भगवद्‍गीता पाठांतर व कंठस्थी पूर्ण करून ऑनलाईन स्पर्धेत सहाशे पैकी सहाशे गुण प्राप्त केले होते. यामध्ये त्यांना सुवर्णपदक देण्यात आले होते.

गीता परिवाराचा पहिला टप्पा झाल्यानंतर त्यांनी श्रृंगिरी शक्तीपीठ आयोजित स्पर्धेत भाग घेतला. ७ जुलै २०२४ ऑनलाईन झालेल्या परीक्षेत त्यांनी विचारलेल्या अध्यायातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तर दिले. स्पर्धेचा निकाल जाहीर होऊन त्यांना नुकतेच जगदगुरु शंकराचार्य विदूशेखर भारती यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व एकवीस हजार रुपयांचा धनादेश दिला.

वडील रायभान महादू राऊत (कोल्हार भगवती) यांनी अनेक धार्मिक ग्रंथ दिल्याने अध्यात्माची आवड निर्माण झाली. मोठी बहीण मीना गाडे हिच्यामुळे गीता परिवारात घेतलेला सहभाग आज सर्वोच्च आनंद देऊन गेला आहे. हे ज्ञान आता भक्तांना मोफत द्यायचे आहे.

- रजनी भरत बेल्हेकर, बेल्हेकरवाडी (सोनई)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT