In Rajur village, police have raided a person who stole a domestic gas cylinder and used it illegally 
अहिल्यानगर

अवैध घरगुती सिलेंडर साठ्यावर छापा; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील राजूर गावात १६२ घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून अवैध वापर करणाऱ्यावर राजूर पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली. याप्रकरणी गणेश उर्फ जितेंद्र नंदू लहामगे ( रा.राजूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांना लहामगे याच्या घरातील खोली व गोठ्यात ठेवण्यात आलेल्या एकूण ३ लाख ७७ हजार ४५० रुपये किंमतीचे अवैध रित्या मोठ्या प्रमाणात १६२ घरगुती सिलेंडरचा साठा केलेला आढळून आला.

तसेच गॅस सिलेंडरमधून वाहनात गॅस भरण्याकरिता लागणारे मशीन व इतर साहित्य मिळून आणले. असून त्यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस नाईक व्ही.के.मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश उर्फ जितेंद्र नंदू लहामगे याच्या विरुद्ध राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार, सहायक फौजदार प्रकाश निमसे, पो.हे.कॉ.कैलास नेहे, पो.ना.व्ही.के.मुंढे आदींच्या पथकाने हा छापा टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT