

Hijack threat on Air India flight from Kolkata to Mumbai.
Sakal
कोलकाता येथून मुंबईच्या दिशेने उड्डाण भरण्याच्या तयारीत असलेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये अचानक 'हायजॅक'चा थरार समोर आल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली. विमानाचे टेक-ऑफ होण्याच्या अवघ्या काही मिनिटे आधी एका कर्मचाऱ्याला विमानाच्या टॉयलेटमधील आरशावर 'विमान हायजॅक होणार' अशी धमकी लिहिलेली आढळली. यानंतर तातडीने सतर्कतेचा इशारा (Alert) देण्यात आला आणि विमानाचे उड्डाण थांबवून त्याला स्वतंत्र आयसोलेशन बे (Isolation Bay) मध्ये हलवण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NSCBI) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही गंभीर घटना घडली.