Ralegan Siddhi, Saklai will come to the field 
अहिल्यानगर

अखेर राळेगणसिद्धी, साकळाई येणार अंगणात... सर्वेक्षणाचे दिले आदेश 

मार्तंड बुचुडे

पारनेर : राळेगणसिद्धी तसेच साकळाई योजनांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविला अाहे. दोन्ही योजनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सोमवारी ( ता. 27) पुणे येथे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.

जलसंपदा विभागाचे मंत्री  पाटील यांनी आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत अधिका-यांची पुणे येथे बैठक अयोजित केली होती. या वेळी राळेगणसिद्धीसह नऊ गावे तसेच नगर तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची आग्रही मागणी लंके यांनी केली.

या योजनांसाठी  कोकणामध्ये वाहून जाणारे अतितिरिक्त पाणी पूर्वेकडे वळविल्यानंतर उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. मंत्री पाटील यांनी पश्‍चिम वाहिनी नदयांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी या दोन्ही योजनांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना या बैठकीत अधिका-यांना दिल्या. 
  
याच  बैठकीत लंके यांनी पिंपळगांवजोगे डावा कालव्याच्या 58 ते 70 किलोमिटरपर्यंतचे अस्तरीकरण करण्याची मागणी केली. त्यावर  अस्तरीकरणाचा प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्याच्या सुचना पाटील यांनी दिल्या. 

पिंपळगांव जोगा डावा कालव्याच्या शेवटी असलेल्या वडझिरे तलावापासून शिवडोह तलावापर्यंतच्या बंदिस्त लाईनचे काम पुर्ण करून पिंपळगांव जोगे धरणातील पाणी शिवडोह तलावापर्यंत पोहचविण्याचे काम तातडीने हाती घेण्यासंदर्भात या बैठकीत पाटील यांनी सुचना दिल्या. 

या बैठकीसंदर्भात  बोलताना  लंके म्हणाले,  विधानसभेचे सदस्य झाल्यापासून या दोन्ही योजनांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करीत होतो, असेही  लंके म्हणाले.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT