अहिल्यानगर

राशीनचा बैल बाजार पूर्वीसारखाच चौखूर उधळला

दत्ता उकिरडे

राशीन : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद करण्यात आलेला आणि राज्यात प्रसिद्ध असलेला येथील आठवडेबाजार लॉकडाऊननंतर आता पुन्हा नव्याने कात टाकू लागला आहे. राज्याच्या विविध भागांतून गायी-बैल, शेळ्या-मेंढ्यांचे व्यापारी खरेदीसाठी येथील आठवडेबाजारात पूर्वीप्रमाणे येत आहेत. 

राशीनचा जनावरांचा आठवडेबाजार राज्यात प्रसिद्ध आहे. पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, बीडसह कर्नाटकमधून मोठ्या संख्येने व्यापारी येथील बाजारात येतात. दर आठवड्याला येथे जनावरांच्या खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. संकरित गायी, खिलारी बैल, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांचा मोठा व्यापार येथे होतो. त्यांच्या खरेदीसाठी सुमारे 200 टेम्पो आणि पिकअप भरून जनावरे घेऊन येथून व्यापारी जातात. 

जनावरे आणि भाजीपाल्याच्या आठवडेबाजारातून राशीन ग्रामपंचायतीला दरवर्षी अर्धा कोटीचे निश्‍चित उत्पन्न मिळते. बैलबाजारांतून कर्जत बाजार समितीलाही चांगले उत्पन्न मिळते. अनेकांच्या रोजीरोटीचा आधार असलेला हा बाजार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद झाल्यावर अनेकांपुढे रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

भाजीबाजारासोबतच आता जनावरांचा बाजारही जोमाने फुलू लागला आहे. आर्थिक उलाढालीमुळे राशीनच्या आठवडेबाजारात पूर्वचैतन्य आले आहे. परिसरातील व्यापारी, दलाल आणि शेतकऱ्यांना या आठवडेबाजाराचा मोठा आधार आहे.

भाजीबाजारासह मिठाई, स्टेशनरी, कटलरी, फळविक्रेते, कापड दुकानदार, किराणा दुकानदार यांच्याही मालाला चांगली मागणी वाढल्याने मोठ्या यात्रेप्रमाणे भरणारा राशीनचा आठवडेबाजार पूर्वीप्रमाणे भरू लागला आहे. 

लॉकडाऊननंतर सुरू झालेले आठवडेबाजार नावापुरतेच भरत होते. कोरोनाच्या भितीने लोक बाजाराकडे फिरकत नव्हते. मात्र, आता ही भिती लोकांमधून गायब झाली असून, बाजारांना यात्रेचे स्वरूप आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT