Reception in Rahata taluka on the occasion of Doctor Gunjal nectar anniversary 
अहिल्यानगर

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ‘या’ कामाचे कौतुक करत मुंबईत केला होता सत्कार

सतीश वैजापूरकर

राहाता (अहमदनगर) : प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असताना, 38 वर्षांच्या सेवेत कुटुंबनियोजनाच्या 75 हजार शस्त्रक्रिया केल्या. आयुष्यातील ही महत्त्वाची उपलब्धी वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करताना हटकून आठवते. ते मंतरलेले दिवस होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्याबद्दल मुंबईत सत्कार केला, तो आयुष्यातील सुवर्णक्षण होता,'' अशा शब्दांत राहाता परिसरातील सेवाभावी डॉ. पी. जी. गुंजाळ यांनी "सकाळ'शी बोलताना भावना व्यक्त केल्या. 

डॉ. गुंजाळ यांनी आज वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश केला. त्यानिमित्त ते म्हणाले, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना, गोड आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो. त्या काळात लोकसंख्या नियंत्रण हा देशाच्या अजेंड्यावरील सर्वाधिक महत्त्वाचा कार्यक्रम होता. आम्ही झपाटल्यासारखे काम करायचो. सहकाऱ्यांची टीम उत्तम होती. सर्व जण स्वतःला झोकून द्यायचे. लागोपाठ 10 वर्षे राहाता प्राथमिक आरोग्य केंद्र कुटुंबनियोजन कार्यक्रमात आघाडीवर राहिले. जिल्ह्यात नावाजले. हे अर्थात टीमवर्कचे यश होते.
ते म्हणाले, राहाता प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, नंतर आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

माजी खासदार (कै.) शंकरराव काळे माझे सासरे. त्यांचा हात सदैव पाठीवर असायचा. त्यांच्या पत्नी (कै.) माई यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. राहाता प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी त्या काळात दिवसरात्र काम करीत. कुटुंबनियोजनाची शिबिरे एकापाठोपाठ एक यशस्वी व्हायची. एका दिवसात सर्वाधिक कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याची संधी मला मिळाली. राज्यभर ही कामगिरी चर्चेचा विषय झाली होती.

खडकेवाके हे गाव आम्ही दत्तक घेतले. महान गाव योजनेंतर्गत तेथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून काम सुरू केले. ग्रामस्थांची मोठी साथ मिळाली. पहिला क्रमांक आला. गावाला 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. ग्रामस्थांनी ट्रॅक्‍टरमधून मिरवणूक काढल्याची आठवण डॉ. गुंजाळ यांनी सांगितली. 

डॉ. गुंजाळ म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून याच गावात दृष्टिदोष विरहित गाव, हा आगळावेगळा प्रकल्प राबविला. आवश्‍यक रुग्णांवर उपचार केले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या. चष्मेवाटप केले. दृष्टिदोष असलेली एकही व्यक्ती गावात राहिली नाही. हा प्रकल्पही राज्यभर गाजला. चांगले सहकारी लाभल्याने अशी कामे करता आली. त्या काळी लोकजागृती फारशी नव्हती. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांसाठी प्रबोधन करावे लागे. घरीच प्रसूती करण्याकडे कल होता. लोकांना सरकारी दवाखान्यात प्रसूतीचे, तसेच माता-बाल संगोपनाचे महत्त्व सांगावे लागत असे. 

शिबिरात सातशेहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया 
डॉ. गुंजाळ म्हणाले, साईसंस्थान व राहाता प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्या वेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे होत. मुंबईतील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल शिवलकर हे सलग 10 वर्षे येथे येऊन शस्त्रक्रिया करीत. एका वर्षी शिबिरात 700हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या. त्या काळात हा विक्रम होता.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Asian Games : महाराष्ट्राच्या लेकांनी वेधला रौप्यपदकाचा अचूक नेम; महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष नेमबाजी संघाचाही डंका

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT