Reconciliation agreement in the new generation of black-foxes 
अहिल्यानगर

काळे-कोल्हेंच्या नव्या पिढीत सामंजस्य करार

सतीश वैजापूरकर

शिर्डी : कोणे एके काळी, माजी खासदार (कै.) शंकरराव काळे यांच्या काळात त्यांचा नगर येथील "लता कुंज' बंगला जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. तीन पिढ्यांनंतर आज तोच जिल्हा बॅंकेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला.

येथे बैठक मारून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सूत्रे हलविली. त्याचा परिणाम आमदार आशुतोष काळे व विवेक कोल्हे या दोन प्रतिस्पर्धी मातब्बर घराण्यांतील युवा नेत्यांची जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली.

सहकारात सहमती महत्त्वाची, हे सूत्र त्यांनी तिसऱ्या पिढीतही जपले. "लता कुंज' बंगला प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा चर्चेत आला. 

माजी खासदार (कै.) शंकरराव काळे यांनी दहा वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. याच काळात जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी एकत्र येऊन नगर येथे यशवंत हाऊसिंग कॉलनी स्थापन केली. तीत काळे यांच्यासोबत आबासाहेब निंबाळकर, यशवंतराव गडाख, माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील, मारुतराव घुले, आबासाहेब देशमुख या दिग्गज नेत्यांनी बंगले बांधले.

काळे यांनी आपल्या बंगल्यास कन्या लता यांचे नाव दिले. या "लता कुंज' बंगल्यावरून त्या काळी जिल्ह्याच्या राजकारणाची आणि कॉंग्रेस पक्षांतर्गत स्वामी सहजानंद भारती गटाची सूत्रे हलविली जात. एका अर्थाने हा "लता कुंज' बंगला त्या काळी जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असे. 

कालांतराने राजकारणाने दिशा बदलली. एकाच गटाचे प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार शंकरराव काळे आणि माजी आमदार शंकरराव कोल्हे हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आले. कोपरगाव तालुक्‍यातील माजी आमदार के. बी. रोहमारे यांचे युग संपले. काळे-कोल्हे संघर्षाचे युग सुरू झाले. कोल्हे यांनी प्रदीर्घ काळ तालुक्‍यावर वर्चस्व कायम ठेवले. मात्र, सहकारात या दोन्ही दिग्गज नेत्यांनी अनेकदा सहमतीचे राजकारण जपले.

ही सहमती माजी आमदार अशोक काळे व त्यांचे प्रतिस्पर्धी बिपीन कोल्हे यांच्या काळातही सुरू राहिली. आता आमदार आशुतोष काळे व विवेक कोल्हे हे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यातही सहमतीवर मतैक्‍य झाले. योगायोग असा, की यंदा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी "लता कुंज' बंगल्यावरूनच या सहमतीच्या राजकारणाची सूत्रे हलविली. 
- अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : पीडित महिला आमदाराला भेटली, व्हिडिओही दाखवले, पण त्याने.... अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा !

Latest Marathi News Live Update : गर्भलिंग निदानप्रकरणी डॉक्टर, एजंट ताब्यात, कोल्हापुरात कारवाई

Chhatrapati Sambhajinagar: अकरावीसाठी कागदपत्रे तयार ठेवा; ऑनलाइन प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आवाहन

Sangamner fuel Shortage: संगमनेरमध्ये इंधन भरण्यासाठी दुचाकींच्या रांगा; दर वाढण्याची भीती? अनेक पंपांचा साठा संपला!

Chhatrapati Sambhajinagar: दोन दिवसांत ४२०० पर्यटकांची उद्यानाला भेट; सलग सुट्यांचा परिणाम;नाथषष्ठीच्या उत्सवानंतर पैठणमधील बाजारपेठेत चैतन्य

SCROLL FOR NEXT