sai madir Reliance to supply oxygen in Shirdi
अहिल्यानगर

रिलायन्स धावले नगरकरांच्या मदतीला, अॉक्सीजन प्रकल्पासाठी अंबानींचा फोन

साई संस्थान येथे अॉक्सीजन प्रकल्प उभारणार

सकाळ डिजिटल टीम

शिर्डी ः कोविड महामारीमुळे संकटात सापडलेल्या उत्तर नगर जिल्ह्याला साक्षात साईबाबा पावणार आहेत. साईसंस्थानचे रुग्णालय जिल्ह्यातील कोविड रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने सज्ज होत आहे. साईभक्तीच्या प्रेरणेतून रिलायन्स उद्योगसमूहाने या रुग्णालयासाठी ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्प व कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारून देण्याची तयारी दर्शविली आहे. रिलायन्स उद्योगसमूहाचे औदार्य उत्तर नगर जिल्ह्याला दिलासा देणारे ठरणार आहे.

साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी काल चित्रफित जारी करून याबाबतचीही माहिती दिली. त्यात त्यांनी रिलायन्स उद्योगसमूहाच्या मदतीची माहिती दिली आहे. समुहाचे आनंद अंबानी यांनी त्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या मदतीने पुढील दहा दिवसांत ऑक्‍सिजननिर्मिती व "एम्स'च्या मार्गदर्शनाखाली आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू करू, असे बगाटे यांनी जाहीर केले.

साईसंस्थान ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्प उभारणार होते. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार होती. आता रिलायन्सने मदतीचे हात पुढे केल्याने कालापव्यय टळणार आहे. संस्थान रुग्णालयात सध्या सध्या 110 ऑक्‍सिजन बेड आहेत. आणखी दोनशे ऑक्‍सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी साईसंस्थानची वैद्यकीय व्यवस्था तयार ठेवण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर पूर्वतयारी सुरू आहे.

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील शासकीय रुग्णालयात 80 लाख रुपये खर्च करून ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. त्याद्वारे शंभर बेडसाठी ऑक्‍सिजन पुरवठा होऊ शकतो. तथापि साईसंस्थानला किती ऑक्‍सिजन बेड वाढवायचे, याचा विचार करून प्रकल्पाची क्षमता ठरवावी लागेल. मात्र त्याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

रेमडेसिव्हिरही मिळणार

एका कंपनीने दोन दिवसांत साईसंस्थान रुग्णालयासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविल्याचे कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.

बातमीदार - सतीश वैजापूरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Karad Silver-Cash Seizure: कऱ्हाडमध्ये ट्रॅव्हल्स वाहनातून १५० किलो चांदी व ४० लाखांची रोकड जप्त; पोलिस व आयकर विभागाची पडताळणी सुरू

Pune Water Issue : पुणे महापालिकेचे कडक पाऊल! व्यावसायिक कारणासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई

SCROLL FOR NEXT