Niliesh Lanke 
अहिल्यानगर

समुपदेशनाने प्राथमिक शिक्षकांच्या होणार विनंती बदल्या

मार्तंड बुचुडे

पारनेर (नगर) : प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करणे योग्य नसून फक्त विनंतीच बदल्या कराव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांच्या वतीने आमदार निलेश लंके यांच्याकडे केली होती. त्यांनी शिक्षकांच्या या मागणींचा विचार करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त विनंतीच बदल्या कराव्यात असा आग्रह व पाठपुरावा राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केला होता. त्या मागणीस य़श आले असून समुपदेशनाने व फक्त विनंती बदल्या करण्याचे आदेश आज सरकारी पातळीवर काढण्यात आले आहेत.

लंके यांनी शिक्षक संघटणांच्या मागणीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षकांच्या फक्त विनंती बदल्या कराव्यात असा आग्रह पालकमंत्र्यांकडे धरला होता व त्यांच्यासोबच दोन वेळा चर्चाही केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. प्रशासकीय बदल्यांचा खो खो या वर्षी रद्द करून फक्त विनंती बदल्या समुपदेशनाने करण्याबाबतचे आदेश बुधवारी (ता. 5 ) शासनाने काढले. कोरोनाच्या महामारीचा विचार करता शिक्षकांच्या बदल्या करणे गैरसोयीचे आहे. 

सामाजिक अंतर ठेवण्याच्या दृष्टीने तसेच शिक्षकांच्या अपरिहार्य प्रशासकीय बदल्यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारी शिक्षकांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी शासनाने विचार करून वरील आदेश ग्रामविकास मंत्रालयाने काढला आहे. शिक्षकांच्या ऑफलाईन पद्धतीने सर्व प्रकारच्या बदल्या करण्याबाबत आदेश 15 जुलै रोजी काढला होता. मात्र अता नव्याने काढलेल्या आदेशामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. विनंती बदल्यांचा आदेश निघाल्याने शिक्षकांच्या यावर्षी गैरसोयी होणार नाहीत. या निर्णयाचे शिक्षकांनी स्वागत केले आहे. 

आमदार निलेशजी लंके म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या गैरसोयीच्या ठरल्या असत्या. शिक्षकांच्या मागणीनुसार मी प्रयत्न केला होता. आता फक्त विनंती बदल्या होणार असल्याने ज्यांची गैरसोय आहे, त्यांच्याच बदल्या होणार असल्याने अनेकांची गैरसोय टळणार आहे. 

पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघांचे अध्यक्ष कारभारी बाबर म्हणाले, शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात आमदार निलेश लंके यांनी शिक्षकांच्या संभाव्य गैरसोयी टाळण्याबाबत शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याने विनंती बदलीचा आदेश निघाला आहे त्यामुळे राज्यातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.  

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT