railway google
अहिल्यानगर

महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील रिझर्व्हेशन सीट होणार कमी

गौरव साळुंके

श्रीरामपूर : आरक्षण रेल्वेतील असो नाही तर नोकरीतील, ते मिळवणे अवघडच. महाराष्ट्र एक्स्प्रेस ही रेल्वे सेवा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणारी आहे. त्यामुळे राज्यातील लोकांना आरक्षण मिळवणे फार जिकिरीचे नव्हते. आता महाराष्ट्राच्या आरक्षणात मध्य प्रदेशचे प्रवासी घुसणार आहेत. आपले हक्काचे आरक्षण कमी होणार असल्याने प्रवासी संघटना तापली आहे.

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील रेल्वे आरक्षणाचा कोटा कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसे झाल्यास या निर्णयाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय राज्य प्रवासी संघटनेने घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य प्रवासी संघटनेची बैठक नुकतीच झाली. त्यावेळी सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचे श्रीगोड यांनी सांगितले.

बैठकीला रवींद्र शहाणे, विजय नगरकर, माणिक जाधव, सुजाता मालपाठक, प्रकाश गदिया, किशोर अग्रवाल, रमेश चंदन, भारत राऊत, गणेश वाघ, किरण घोलप उपस्थित होते. कोरोनामुळे संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोरोनामुळे दोन वर्षे संघटनेचे कामकाज ठप्प असल्याने विशेष बैठकीचे आयोजन केले होते. (Reservation seats in Maharashtra Express will be less)

कशामुळे काय झाले

अनेक वर्षांपासून विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी कोल्हापूर- नागपूर-गोंदिया एक्स्प्रेस प्रवासी सेवेत कार्यरत होती. मात्र, ही एक्स्प्रेस पुढे बालाघाट, जबलपूर, कटनी, सतना, रेवापर्यंत विस्तारण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेतला आहे. तसा आदेशही जारी केल्याची माहिती श्रीगोड यांनी दिली.

सर्वत्र असलेल्या रेल्वे आरक्षणाचा कोटा कमी होण्याचा धोका यामुळे निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम सर्वत्र होणार असून, तसे झाल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा प्रवासी संघटनने दिला आहे.

या संदर्भात नागपूर परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, कोल्हापूर- धनबाद ही साप्ताहिक दीक्षाभूमी एक्स्प्रेस या रेल्वेमार्गावरून बंद झाल्याने गया व सम्मदशिखरजी येथे जाणाऱ्या बौद्ध व जैन समाजाच्या भाविकांची गैरसोय झाली. पुणे-धनबाद रेल्वे सुरू करण्याच्या मागणीचा ठराव बैठकीत झाला.

पुणतांबे-साईनगर व दौंड कॉर्डलाइन रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी तत्काळ विशेष निधी मंजूर करण्याची मागणी संघटनेने केली. दीपक सिकची व चंद्रकांत परदेशी यांना आजीवन सदस्य करण्यात आले. प्रारंभी प्रा. गोरख बारहाते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दत्तात्रेय काशीद यांनी आभार मानले.(Reservation seats in Maharashtra Express will be less)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात; सहाशेपेक्षा जास्त आंदोलकांना पोलिसांनी उचललं, आकाशवाणीजवळ दगडफेक

Balinga Dhonwade Road : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील दोनवडे-बालिंगा रस्त्याचे काम अपूर्ण; प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, कधी पूर्ण होणार काम?

मुंबईची मुलगी... रियाच्या घरी पोहोचले पोलीस! CJP आंदोलनाची केली चौकशी अन्... नेमकं काय घडलं? Video

Marathi News Live Updates : दिल्लीनंतर आता मुंबई-पुण्यातही आंदोलकांची धरपकड, १५० जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

''ज्या देशाने परकियांचा माज उतरवला, तिथे स्वकियांचा माज जनता उतरवणार नाही वाटतं का?'' राज ठाकरे संतापले...

SCROLL FOR NEXT