Retired IAS officer struggles for half ticket
Retired IAS officer struggles for half ticket Sakal
अहमदनगर

हाफ तिकिटासाठी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याचा आटापिटा!

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - निवृत्त आयएएस अधिकारी एसटी बसने प्रवासाला निघाले. अर्धे तिकीट दिले नाही म्हणून थेट नियमाला भिडले. नियमावरून कंडक्टरही अडले. हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोचले. मग पोलिसांनी महाराष्ट्राचे नियम सांगितल्यावर गप्प बसले.

त्याचे असे झाले, उत्तर प्रदेश केडरचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एम. एम. रस्तोगी आणि म्हैसूर (कर्नाटक) येथे केंद्र शासनाच्या सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी अँड रीसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (सीएफटीआरआय) वैज्ञानिक असलेला त्यांचे चिरंजीव डॉ. नवीन रस्तोगी हे म्हैसूरहून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता. २३) रात्री कर्नाटक बसने पुण्यापर्यंत आले. पुण्याहून शिर्डीला येण्यासाठी पुणे-धुळे शिवशाही बसने (एमएच ६ बी डब्ल्यू ८५९) शिर्डीला येण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता निघाले.

रस्तोगी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतीच्या तिकिटाची मागणी केली. वाहकाने पूर्ण तिकीट घेण्यास सांगितले. तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी नसल्यामुळे तुम्हाला पूर्ण तिकीट घ्यावे लागेल, असे सांगितले. रस्तोगी पिता-पुत्रांनी आपले आधार कार्ड, तसेच ओळखपत्र दाखवून आधार कार्डवरील वयानुसार ज्येष्ठ नागरिक ठरत असल्याचे सांगितले. म्हैसूरहून पुण्याला येताना कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसने ज्येष्ठ नागरिकाचे तिकीट दिल्याचे दाखविले.

एसटी बसवाहक शिर्डीचे पूर्ण तिकीट ४५५ रुपये घेण्याबाबत ठाम राहिला. त्यामुळे रस्तोगी यांनी मंत्रालयातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना ही माहिती दिली, तसेच बस अहमदनगरला आल्यानंतर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी अगर प्रमुखांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर बस एसटीच्या सर्जेपुरा विभागीय कार्यालयात आणण्यात आली. त्यामुळे प्रवासी अन्य बसमध्ये बसवून देण्याची मागणी करू लागले.

अखेर सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि पिता-पुत्रांमध्ये वाद झाले. दोघांनीही एकमेकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले. रस्तोगी यांनी बस तोफखाना पोलिस ठाण्यात दुपारी एक वाजता नेली. एसटीचे वरिष्ठ अधिकारीही तोफखाना पोलिस ठाण्यात आले. त्यामुळे त्यांच्या समवेत या कार्यालयातील इतर कर्मचारी आणि वाहक, चालक आणि तिकीट तपासणी पथकातील इतर कर्मचारीही तोफखाना पोलिस ठाण्यात आले.

पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी एसटी

महामंडळाचे अधिकारी आणि रस्तोगी पिता-पुत्र यांचे म्हणणे ऐकून दोघांनाही समजावून सांगितले. त्यामुळे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय दोघांनी अखेर रद्द केला.

ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात असलेली सवलत ही फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या नागरिकांसाठीच आहे. इतर राज्यांतील प्रवाशांना तिकिटात ही सवलत देता येत नाही. एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी हे प्रवाशांशी सौजन्याने आणि नियमानुसार वागतात.

- विजय गिते, विभाग नियंत्रक, अहमदनगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT