आत्महत्या sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : पोलिस ठाण्याच्या आवारात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : फलटण (जि. सातारा) येथील एका सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याने कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्ञानेश्‍वर तुकाराम मराठे (वय 62, रा. फलटण) असे मयत व्यक्‍तीचे नाव आहे.

शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात स्वच्छतागृह आहे. त्याचा फारसा वापर केला जात नाही. तेथून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी जाऊन पाहिले. तेव्हा तेथील शॉवरला लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिस कर्मचाऱ्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना दिली.

शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह खाली काढून तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला. पोलिसांना घटनास्थळी एक बॅग आढळून आली. त्यामध्ये काही कपडे, एस. टी. ची तिकिटे, वाहन परवाना अशी कागदपत्रे होती. या कागदपत्रांवरून संबंधित व्यक्तीचे नाव ज्ञानेश्‍वर तुकाराम मराठे असे असल्याचे निष्पन्न झाले. ते एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी असल्याचेही निष्पन्न झाले आले. त्यांच्याकडे आढळून आलेल्या तिकिटानुसार ते ता. 16 ऑक्‍टोंबरला नगरला आले होते. मात्र, ते कशासाठी नगरला आले होते. त्यांनी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली? कोतवाली पोलिस ठाण्याचा आवारातील या स्वच्छतागृहात का? आणि ते कसे गेले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

मयत व्यक्तीच्या मुलाशी संपर्क झाला आहे. ते आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. मयत इतर कोणत्या पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे दिसून येत नाही. कुटुंबीयांकडून अधिक माहिती मिळाल्यावर या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

SCROLL FOR NEXT