The revenue department took action against the illegal transport of sand 
अहिल्यानगर

तहसीलदारांचा चढता पारा.. वाळूचोरांचे वाजले बारा!

सचिन सातपुते

शेवगाव : महसूल विभागाने मागील 15 दिवसांत वाळू, खडी व मुरमाची अवैध वाहतूक करणारी 14 वाहने ताब्यात घेतली. त्यांच्यावर कारवाई करीत 26 लाख 63 हजार 650 रुपये दंड ठोठावला. त्यातील 9 वाहनांकडून 13 लाख 78 हजार 950 रुपये दंड वसूल केल्याची माहिती तहसीलदार अर्चना भाकड यांनी दिली. 

गेली दोन महिने कोरोनाबाबत खबरदारी आणि उपाययोजनात प्रशासन व्यस्त होते. महसूल विभागात प्रभारीराज सुरू असल्याने तालुक्‍यात वाळू, खडी, मुरुम आणि मातीचा बेसुमार उपसा सुरू होता. या अवैध वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा व्यवसाय जोमात चालला होता.

दरम्यानच्या काळात शेवगावला तहसीलदार भाकड यांची बदली झाली. त्यांनी तालुक्‍यातील वाळूसह इतर गौण खनिज चोरी करणाऱ्यांची माहिती संकलीत केली. 

13 लाख 78 हजार रुपये वसूल 

तालुक्‍यातील नदी, नाले व ओढ्यांची पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणात वाळू व मुरमाचा अवैध उपसा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी कारवाईचे धडक सत्र राबवित गेल्या 15 दिवसांत विनापरवाना वाळूवाहतूक करणाऱ्या सहा डंपरवर 9 लाख 12 हजार 950 रुपये, खडी वाहतूकीच्या सहा डंपरवर 13 लाख 31 हजार 50 रुपये, तर मुरमाच्या दोन डंपरवर 4 लाख 19 हजार 650, असा एकूण 14 वाहनांवर 26 लाख 63 हजार 650 रुपये दंड ठोठावला. त्यातील 9 वाहनमालकांनी 13 लाख 78 हजार 950 रुपये दंड भरला आहे. इतर पाच वाहनमालकांनी अद्याप दंड भरलेला नाही. 

वाळूचोरांचे धाबे दणाणले 

तहसीलदारांच्या या कारवाईमुळे वाळूसह मुरुम, माती, खडीची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. शिवाय तालुका महसूल प्रशासनास दिलेले वार्षिक आठ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अशा कारवाईत सातत्य राखणे गरजेचे आहे, अन्यथा तो नेहमीप्रमाणे केवळ एक फार्स ठरण्याची शक्‍यता आहे. 

वाळूचोरांचे नेटवर्क सतर्क 

मुंगी येथील गोदावरी नदीतील वाळूला राज्यातून मोठी मागणी आहे. त्यामुळे लिलाव होवो न होवो, या परिसरातील नदीसह व ओढ्या-नाल्यातून वाळूचा बेसुमार उपसा होतो. महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवित सातत्याने कारवाई केली, तर त्यास निश्‍चित आळा बसेल. वाळूचोरांच्या सतर्क नेटवर्कमुळे पोलिस किंवा महसूल पथकाच्या कारवाईपूर्वीच कुणकुण लागत असल्याने दरवेळी टाकलेला छापा निव्वळ फार्स ठरतो. 

पकडलेली वाहने सोडून देण्याचे प्रकार 

अवैध वाहतूक करणारी वाहने पकडल्यानंतर, जागेवर तडजोड करून सोडून देण्याचे प्रकार यापूर्वी तालुक्‍यात अनेकदा घडले आहेत. शिवाय कारवाईनंतर तहसील किंवा पोलिस ठाण्यात आणलेली वाहने परस्पर सोडून देण्याचे प्रतापही घडत असतात. त्यामुळे प्रशासनातील अशा दुव्यांना शोधण्याचे आव्हान तहसीलदार भाकड यांच्यासमोर आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : राणे कुटुंबीयांच्या जुहूतील घरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT