

Maharashtra Food Safety Action In Parbhani Milk Products Shop License Suspended After Multiple Food Safety Violations Found
sakal
परभणी: सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा विभागाने वसमत रोडवरील एमआयडीसी परिसरातील मे. रिशा मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्ट्स या पेढीवर रविवारी (ता.१३) छापा टाकला. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे विविध उल्लंघन आढळून आल्याने पेढीचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. ६१ हजार २७५ रुपये किमतीची २१५ किलो स्कीम मिल्क पावडर जप्त करण्यात आली.