Revenue in Nevasa taluka is 2 crore Rs more than the given target 
अहिल्यानगर

कोरोनातही ‘या’ तालुक्यात दिलेल्या टार्गेटपेक्षा दोन कोटीचा जादा महसूल

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यात 2019- 20 या आर्थिक वर्षात गौण खनिज उत्खनन, जमीन व इतर महसूलातून जवळपास नऊ कोटी 80 लाख 20 हजार 894 रूपयांचा नगर जिल्ह्यात दुसर्या क्रमांकाचा महसूल नेवासे तालुका तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.
विशेष म्हणजे यावर्षी नेवासे तालुक्याला सात कोटी 60 लाखाचे उद्दिष्टे देण्यात आले होते. मात्र तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी उद्दीष्टापेक्षाही दोन कोटी 20 लाख 894 रुपयांचा अधिकचा महसूल जमा केला. तालुक्यात मुळा, प्रवरा नद्या आहेत. तसेच नगर- औरंगाबाद, नाशिक- गेवराई हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. या रस्त्यांसह तालुकांतर्गत रस्त्यांच्या कामांबरोबरच खाजगी, शासकीय बांधकामे मोठ्याप्रमाण सुरु असतात. तालुक्यात वीटभटयाही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मुरूम, माती, खडी, तसेच वाळू व स्टोनक्रेशर आदि गौण खनिज उत्खनन सुरू असते. यासह आदी महसूलकारातूनच हा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.33 वाहनांवर केली कारवाई
2019- 20 या आर्थिक वर्षात अवैध वाळू, मुरूम, उपसा व वाहतूक करणार्यां 33 वाहनांवर तहसील प्रशासनाने कारवाई करून 37 लाख 02 हजार 635 रूपयांचा दंड वसूल केला. यामध्ये एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात येवून आठ जणांना अटक केली होती.

तहसिलदार रुपेशकुमार सुराणा म्हणाले, गौण खनिज उत्खननापूर्वी कायदेशीर मान्यता आवश्यक आहे. परवानगी न घेता उत्खनन केल्यास कायदेशीर कारवाई करून नियमाप्रमाणे दंड वसूल करण्यात येतो. यावर्षीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महसुलच्या सर्वच कर्मचार्यांनी योगदान देवून महसूल वसूल केली आहे.

प्राप्त महसूल 
• गौण खनिज महसूल - 78782388. 
• जमीन महसूल - 19673228. 
• इतर महसूल - 565278.
• एकूण महसूल -9,80,20,894.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT