Major Rishabh Singh Retirement at 30
esakal
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी एडीसी मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी भारतीय लष्करातून मुदतपूर्व निवृत्ती घेतली आहे. जवळपास १२ वर्षांच्या लष्करी सेवेनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लडाखसारख्या आव्हानात्मक भागात सेवा बजावण्यासोबतच ते ४ पॅरा स्पेशल फोर्सेसचाही भाग होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात एडीसी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. आता त्यांच्या निवृत्तीनंतर मेजर ऋषभ यांना पेन्शन मिळणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.