nagar sakal
अहिल्यानगर

अहमदनगरमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

कार्यालयात धिंगाणा घालणाऱ्या दोघांना अटक होईपर्यंत काम बंद

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका : तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी (ता. १८) दुपारी तहसीलदारांनी (tahsildar nagar taluka)बोलाविलेल्या तलाठी व मंडलाधिकाऱ्यांच्या बैठकीत धिंगाणा घालणाऱ्या दोघांना अटक होईपर्यंत तालुक्यातील सर्व तलाठी, मंडलाधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. याबाबत ५४ कर्मचाऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन कर्मचारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. १९) दुपारी अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले आहे.नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. १८) दुपारी तहसील कार्यालयात तलाठी, तसेच मंडलाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. तहसीलदार पाटील यांनी नगर तालुक्यासंदर्भातील विविध विषयांचा आढावा घेतला.

बैठक सुरू असतानाच श्याम नामदेव कोके व सचिन एकनाथ एकाडे आले व त्यांनी तहसीलदारांना अरेरावी करण्यास सुरवात केली. तहसीलदार पाटील यांनी, ‘आमची बैठक सुरू आहे. तुम्ही या ठिकाणी थांबू नका. मी तुम्हाला बोलवेन तेव्हा या,’ असे सांगितले. मात्र, या दोघांनी तहसीलदार पाटील यांना, तसेच सर्वांनाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी तलाठी ज्ञानदेव बेल्हेकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी श्याम कोके व सचिन एकाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. त्यामुळे नगर तालुक्यातील सर्व तलाठी, मंडलाधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.

याबाबत कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. संबंधितांना अटक होईपर्यंत तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी निवडणूक व इतर अत्यावश्यक काम वगळता इतर सर्व कामकाजावर बहिष्कार घालत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ५४ महसूल कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT