The right water bank has been set up for Saradwadikars. Seven and a half to eight liters of water will be stored after the rainy season 
अहिल्यानगर

सरदवाडीकरांसाठी हक्काची वॉटर बँक तयार; आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून झाला चमत्कार

वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : सरदवाडीकरांसाठी हक्काची वॉटर बँक तयार झाली आहे. पाऊसाळ्यानंतर साडे सात ते आठ लिटर पाणी साठणार आहे. पुढच्या वर्षी पाणीपुरवठा विहिरीसह पुरातण आड व पंचक्रोशीतील खाजगी विहीरींची पाणी पातळी वाढणार आहे. तसेच पुढील काळात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासणार नाही. हा चमत्कार आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून साकरलेल्या 'नालाबांध खोलिकरण व भराव सांडवा नुतणीकरणा' च्या महत्वकांक्षी कामामुळे झाला आहे. 

गेले महिनाभर काम सुरु होते. अथक परिश्रमातून सरदवाडीकरांसाठी हक्काची वॉटर बँक तयार झाली आहे. त्यामुळे पाऊसाचे तब्बल साडेसात ते आठ कोटी लिटरहून अधिक पाणी येथे आडविले जाणार, असे 'तज्ञां'चे मत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विहिरीला चांगले पाणी राहील आणि भविष्यकाळातील अडचणीवर निश्चित मात करता येईल, हे मात्र निश्चित !

सरदवाडी (ता.जामखेड) हे एक हजार लोकसंख्येचे गाव. मात्र दरवर्षी उन्हाळा आला की पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. ग्रामस्थांच्या पाचवीला पुंजलेली हे दुष्काळ. दरवर्षी टँकरच्या पाण्यावरच येथील ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागायची. त्यामुळे ग्रामस्थांही दरवर्षीच्या या अडचणीला वैतागून त्रस्थ झाले होते. त्यामुळे काही ग्रामस्थांच्या सोयीनुसार वस्त्या व अन्यत्र स्थलांतर केले. मात्र काही ग्रामस्थांनी आपलं घरं आणि गाव काही सोडलं नाही. तसे स्थलांतर हा पर्याय नव्हता. परिस्थितीवर मात करण्यासाठी एकमुखी प्रयत्न करणे गरजेचे होते. यासाठी कोणी तरी पुढे येऊन ग्रामस्थांमधील उर्जा जागी करण्याची आवश्यकता होती.

अखेर 'जलदूत' म्हणून आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी वाडीतील पाणीपुरवठा विहीर व जुन्या आडा जवळच्या दोन नाल्यांचे खोलीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. ग्रामस्थांनी तयारी दाखविली. आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या प्रयत्नातून 'सकाळ' रिलीफ फंड, कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्था व नाम फौंडेशन या संस्थेच्या मदतीने आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सरदवाडी येथील दोन्ही नालाबांधांचे खोलिकरण व भराव, सांडवा नुतनीकरणाचे काम उभे राहिले आणि तब्बल साडे सात ते आठ कोटी लिटर पाणीसाठवण करण्याची क्षमता तयार झाली आहे. याचा फायदा यावर्षी पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या विहीरीच्या स्त्रोतास बळकटी मिळण्यास होईल, हे मात्र निश्चित. तसेच यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण राहणार नाही आणि पुढील काळात पाणीसाठवण्यासाठी हक्काची 'वॉटर बँक' नाला खोलिकरणामुळे झाली .

आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी पुढाकार घेतला आणि सरदवाडी च्या नाला खोलिकरणाचे काम  झाले. त्यामुळे पाणीपुरवठा विहीरीसह पंचक्रोशीतील विहिरींच्या स्त्रोतास बळकटी मिळेल आणि पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होईल. ग्रामस्थांची आडचण सुटेल".
-  रामदास सिरसाट, रहिवासी सरदवाडी तथा  माजी सरपंच कुसडगाव ग्रामपंचायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT