नेवासे : कोरोना काळात निर्माण झालेले गैरसमज आणि पसलेल्या अफवांमुळे कुकुट पालन व्यवसाय कोलमडला होता. अनेक व्यवसायिक कर्जबाजारी झाले होते. अनेकांना मागणीअभावी अंडी आणि कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या. मात्र, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अंडी, चिकन खाण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून मिळत असल्याने सध्या कुकुटपालन व्यवसायाला 'अच्छे दिन' आले आहेत.
सध्या एका अंड्यासाठी सात रुपये मोजावे लागत आहे, तर चिकनचे दर वाढून प्रतिकिलो १६० ते २०० रुपये झाले आहेत. व्यवसाय पूर्वपदावर आल्याने व्यावसायिकांमध्ये सामाधान झाले.
सध्या सर्वच नागरिक आहाराच्या याबतीत जागृत झाले आहे. सध्या प्रोटीनयुक्त आहारावर भर दिला जात आहे. त्यामध्ये अंडी, चिकनमध्ये प्रोटीन अधिक असल्याने त्याला मागणी रुग्णांनादेखील दररोज आहारात अंडी दिली जात आहे. त्यामुळे मागणी वाढल्यामुळे दरात वाढ झाली आहे. मागणी वाढल्यामुळे अंडी व चिकनच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोशल मीडियावरून तसेच इतर माध्यमातून नागरिकांना सकस आणि पौष्टिक आहाराचे महत्व पटवून दिले जात आहे. अंडी व चिकनला व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
पोल्ट्री व्यावसायात उभारी
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात चिकनविषयी गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे २० ते ३० रुपये किलोपर्यंत दर उतरले होते. यामुळे व्यावसायिकांनी कोंबड्या वाटून दिल्या. याच काळात मटनाच्या दरात वाढ झाली होती. मात्र डॉक्टरांकडून अंडी खाण्याचा सल्ला दिला जात असल्याने पोल्ट्री व्यावसायात उभारी आली आहे.
"कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायिक सर्वाधिक अडचणीत आले होते. नंतरच्या काळात वस्तुस्थिती नागरिकांना समजल्याने अंडीच्या मागणीत वाढ झाली आहे. कोरोना काळात झालेले नुकसान भरुन निघण्यास नक्कीच मदत होणार आहे.
-तुषार नवले, कुकुटपालन व्यावसायिक, भेंडे खुर्द, ता. नेवासेसंपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.