पहिल्याच पावसात तलावात आलेले पाणी. 
अहिल्यानगर

नदीजोड प्रकल्प यशस्वी, पहिल्याच पावसात त्या तलावात पाणी 

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ः जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या संकल्पनेतील पारनेर तालुक्‍यातील कापरी नदीवरील पहिला नदीजोड प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या नदीजोड प्रकल्पाचे वासुंदे गावाच्या पठारावर काम करण्यात आले होते. त्यातून तयार केलेल्या पाझर तलावात पहिल्या पावसात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्पही यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उन्हाळ्यात वासुंदे गावाचा पाणीप्रश्न बिकट होतो. सुजित झावरे यांनी चिखल मळा पाझर तलावाच्या ठिकाणी स्वतः पाहणी करून वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग कसा करता येईल, याचा विचार करून आपली संकल्पना गावातील काही ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीने साकार करण्याचे ठरविले होते. मागील वर्षी 18 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाच लाख रुपये खर्च करून झावरे यांच्या संकल्पनेतील नदीजोड प्रकल्प या ठिकाणी राबविण्यात आला होता. पश्‍चिम दिशेला असणाऱ्या डोंगरउतारावरचे पाणी मोठा चर खोदून गावाच्या पाझर तलावाकडे वळविले. त्याचीच फलश्रुती आज पाहायला मिळाली.

या डोंगराळ भागात बुधवारी (ता. 13) पाऊस झाला. या पावसाचे पाणी डोंगरावरून नदी-जोड प्रकल्पाद्वारे खोदण्यात आलेल्या चरावाटे थेट तलावाच्या दिशेने झेपावले प्रथमच इतक्‍या कमी पावसातही चिखल मळा पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आले. हा छोटा प्रकल्प आहे; परंतु गावासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. वाया जाणाऱ्या पाण्यावर काम करणे गरजेचे असल्याचे झावरे यांनी सांगितले. 

नदीजोड प्रकल्प राबवून गावे स्वयंपूर्ण करा 
तालुक्‍याचा दुष्काळी शिक्का पुसणे गरजेचे आहे. त्याकरिता गावांनी नदीजोडसारखे प्रकल्प राबवावेत. त्यामुळे डोंगरावरून जाणारे पाणी गावातीलच तलावात साठविण्यात येऊन, त्याची गावाची पाणीपातळी वाढविण्यास मदत होईल. अन्य गावांनी नदीजोड प्रकल्प राबवून गावे स्वयंपूर्ण करावीत. 
- सुजित झावरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, नगर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : अटल सेतूवर मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक; पोलिसांशी चकमक; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये गणेशोत्सवामुळे वाहतूक बदलाचे नियोजन; 'या' मार्गांवर 'नो एन्ट्री'

मराठा आरक्षणासाठी मुंबईत जरांगेंचं बेमुदत उपोषण; अमित शाहांची भेट घेऊन शिंदे लगेचच जाणार गावी, राजकीय चर्चांना उधाण

Heavy Rains: अकोला, वाशीम, यवतमाळात पाऊस सुरूच; कापूस, सोयाबीन, तूर पिकांना फटका, रस्ते आणि पूल पाण्याखाली

बापरे! जया बच्चनने पपाराझीसमोर केलं असं काय? की उपस्थितासह चाहते झाले शॉक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT