rohit pawar sakal media
अहिल्यानगर

"रोहित पवारांचा विकास केवळ सोशल मीडियात"

मतदारसंघात फिरायला आमदार रोहित पवारांना पोलिस बंदोबस्त कशासाठी, असा सवाल भाजप नेते दादासाहेब सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : येथील नगरपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. आमदार रोहित पवार विरुद्ध खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या समर्थकांत राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच फटाके फुटत आहेत. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

मतदारसंघात फिरायला आमदार रोहित पवारांना पोलिस बंदोबस्त कशासाठी, असा सवाल भाजप नेते दादासाहेब सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे, की नव्या पर्वाची आगळीवेगळी सुरवात झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बिल भरायचे, की दिवाळी साजरी करायची, असा प्रश्न यामुळे तालुक्यातील शेतकरी व जनतेला पडला आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे तर लोकप्रतिनिधी पोलिस बंदोबस्तात फिरत नाहीत ना? गेल्या दोन वर्षांत आमदार पवार यांनी मतदारसंघातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली, असा गवगवा ते सोशल मीडियात करीत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्जत तालुक्यातील शेतीपंप व घरगुती वीजजोड असलेल्या अनेक रोहित्रांचा वीजपुरवठा महावितरणने तोडला आहे. दोन वर्षांत एकही ठोस विकासकाम नाही.

महामार्गाच्‍या भरपाईतही काळेबेरे

माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अहमदनगर-सोलापूर महामार्गाचे काम मंजूर झाले. नुकसान भरपाईसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला. मात्र, यामध्ये अनेक ठिकाणी काळेबेरे झाले. याबाबत खासदार विखे पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी गेल्या आहेत. तत्कालीन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी दादासाहेब सोनमाळी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT