Rohit Pawar gave Remdesivir for Pune, Solapur, Nagar 
अहिल्यानगर

पुणे, सोलापूर, नगरसाठी रोहित पवारांनी दिले मोफत रेमडेसिवीर

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राज्य कोरोनाच्या खाईत लोटले गेले आहे. प्रत्येक शहरात रूग्णसंख्या वाढते आहे. रेमडेसिवीर या इंजेक्शनसाठी मेडिकल आणि रूग्णालयांबाहेर रांगा लागत आहेत. या इंजेक्शनचा काही जणांनी काळाबाजार केला आहे तर काही ठिकाणी डॉक्टर आवश्यकता नसताना रूग्णांना ते टोचवत आहेत, त्यामुळे ही स्थिती उदभवली आहे. इंजेक्शन मिळवण्यासाठीही वशिलेबाजी करावी लागत आहे.

राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी मोफत इंजेक्शन उपलब्ध करून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर ट्रस्टने (Nationalist Congress Welfare Trust) हे वाटप केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत रोहित पवार यांनी औषधांचा साठा सरकारी यंत्रणेकडे सुपूर्द केला. त्यांनी तशा आशयाचे ट्विट केले आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. कोणीही कितीही फोनाफोनी केली तरी हे इंजेक्शन मिळत नाहीत. गोरगरिबांसाठी राष्ट्रवादीने ही औषधं उपलब्ध करून दिली आहेत.

कर्जत-जामखेडलाही मदत

रोहित पवार हे कर्जत-जामखेड या मतदारसंघात तसेच राज्यातही लोकांच्या मदतीला धावून जात असतात. मागील लॉकडाउनच्या काळात त्यांनी संपूर्ण राज्यभर सॅनिटायझर्सचे मोफत वाटप केलं होतं. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टही मदतीसाठी आघाडीवर आहे. यावेळीही रेमडेसिवीरची टंचाई जाणवत आहे. तरीही त्यांनी औषधं उपलब्ध करून दिली. याबद्दल लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आस्था निर्माण झाली आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT